ETV Bharat / state

धुळ्यात शेती मशागतीच्या कामांना वेग, कापसाच्या क्षेत्रात वाढ - dhule cotton crop news

मृग नक्षत्राला सुरुवात होताच जिल्ह्यात शेतकरी कामाला लागले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ झटकून टाकत त्यांनी नवउमेदीने लागवड आणि पेरणीयोग्य क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षी मालपूरसह परिसरात कापूस लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर, कांदा मिरची पिकाच्या क्षेत्रफळात घट झाल्याचे दिसत आहे

धुळे शेतकरी न्यूज
धुळे शेतकरी न्यूज
author img

By

Published : Jun 9, 2020, 1:39 PM IST

धुळे - मृग नक्षत्राला सुरुवात होताच जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मालपूरसह परिसरातील विविध परिसरातील शेतकरी कामाला लागले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ झटकून टाकत त्यांनी नवउमेदीने लागवड आणि पेरणीयोग्य क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षी मालपूरसह परिसरात कापूस लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर, कांदा मिरची पिकाच्या क्षेत्रफळात घट झाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. तेथील कापूस लागवडीचे काम पूर्णत्वास आले आहे. सध्या कोरडवाहू कापसाच्या लागवडीयोग्य क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. हे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा पाऊस धुळे जिल्ह्यात झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवडीच्या कामांना वेग दिला आहे. मिरचीसाठी दोंडाईचा बाजारपेठ प्रसिद्ध आहे. मात्र, दोन वर्षांपासून मिरची लागवडीच्या क्षेत्रात सतत घट होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवड क्षेत्रही घटणार आहे. या पिकासाठी भरपूर पाणी लागते. मात्र, पाणी उपलब्ध असूनही सध्या या पिकाचा बाजारपेठेतील भाव लक्षात घेता याकडे येथील शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

साक्री तालुक्यातील मालपूरसह परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय असून शेतीच्या उत्पन्नावर येथील अर्थचक्र अवलंबून आहे. त्यामुळे सर्व मरगळ झटकून शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने हलक्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कापसाला सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.