ETV Bharat / state

सत्ता स्थापनेनंतर धुळ्यात भाजपचा जल्लोष

विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होऊन एक महिना उलटून देखील राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम होता. सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अनेक बैठका झाल्या. अखेर गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते

सत्ता स्थापनेनंतर धुळ्यात भाजपचा जल्लोष
author img

By

Published : Nov 23, 2019, 12:05 PM IST

धुळे - गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) सकाळी आठ वाजता शपथ घेतली. मात्र, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या शपथविधीनंतर धुळे शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरी केला.

सत्ता स्थापनेनंतर धुळ्यात भाजपचा जल्लोष

हेही वाचा- सरकार स्थापनेमध्ये शरद पवारांचा सहभाग - सूत्र

विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होऊन एक महिना उलटून देखील राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम होता. सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अनेक बैठका झाल्या. अखेर गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, संपूर्ण रात्रभरातून विशिष्ट राजकीय खेळी खेळली गेली. अखेर आज सकाळी राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. मात्र, या सत्ता स्थापनेनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत शरद पवार यांना कुठलीही माहिती नसल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या सत्ता स्थापनेनंतर धुळे शहरात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी आठ वाजता शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या शपथविधीनंतर धुळे शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.

Body:विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होऊन एक महिना उलटून देखील राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम होता. सत्ता स्थापन करणेबाबत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अनेक बैठका झाल्या, अखेर गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते, मात्र संपूर्ण रात्रभरातून विशिष्ट राजकीय खेळी खेळली गेली. अखेर शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकत्र येत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. मात्र या सत्ता स्थापनेनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं असून राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत शरद पवार यांना कुठलीही माहिती नसल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे, या सत्ता स्थापनेनंतर धुळे शहरात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.