धुळे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील काँग्रेसला तीन आणि भाजपला दोन मतदारसंघ मिळाले होते. यंदा धुळ्यात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
![dhule-assembly-election-result-news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4841057_dhule.jpg)
हेही वाचा- सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या बॅनर्जींच्या विचाराशी सहमत नाही - जयराम रमेश
धुळे जिल्ह्यातील धुळे शहर विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे याठीकाणी शिवसेनेच्या हिलाल माळी का अनिल गोटे बाजी मारतील हे पहाव लागणार आहे.
त्यासोबोतच सिंदखेडा मतदार संघ देखील जिल्ह्यात लक्षवेधी ठरला आहे. याठिकाणी भाजपचे जयकुमार रावल की संदीप बेडसे असे एकंदरीत चित्र असणार आहे.
साक्री विधानसभा मतदारसंघ - या विधानसभा मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणूकीत 62.42 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघातून काँग्रेसचे डीएस अहिरे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे मंजुळा गावित यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात 59.59 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे मोहन गोकुळ सुर्यवंशी विरुद्ध काँग्रसचे धनाजी अहिरे यांच्यात मुख्य लढत झाली आहे.
हेही वाचा- माजी आमदार अनिल गोटे मतमोजणीपर्यंत देणार ईव्हीएम मशीनजवळ पहारा
धुळे ग्रामीण मतदारसंघ - या विधानसभा मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणूकीत 66.86 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघातून काँग्रेसचे कुणाल पाटील यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे मनोहर भदाने यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात 65.59 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात भाजपच्या ज्ञानज्योती बदाणे पाटील याच्या विरुद्ध काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात लढत झाली आहे.
हेही वाचा- पवारांना वैयक्तिकरित्या पाठिंबा, पक्षातील वरिष्ठांशी केली होती चर्चा - अशोक माने
धुळे शहर मतदासंघ- या विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणूकीमध्ये भाजपचे अनिल गोटे यांनी 57 हजार 780 एवढी मते घेत विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात 49.40 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे हिलाल माळी यांच्या विरुद्ध अनिल गोटे यांच्यात लक्षवेधी लढत झाली आहे.
हेही वाचा- हुमायून मर्चंट 24 ऑक्टोबरपर्यंत 'ईडी' कोठडीत, अधिक चौकशी करण्यासाठी घेतला निर्णय..
शिरपूर मतदारसंघ- या विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणूकीत 66.4 टक्के मतदान झाले होते. येथे काँग्रेसचे काशीराम पावरा यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात 65.50 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात भाजपच्या काशिराम पावरा यांच्या विरुद्ध काँग्रसचे रणजीत भरत सिंग पावरा यांच्यात मुख्य लढत झाली आहे.
हेही वाचा- पवारांना वैयक्तिकरित्या पाठिंबा, पक्षातील वरिष्ठांशी केली होती चर्चा - अशोक माने
शिंदखेडा मतदारसंघ- या विधानसभा मतदारसंघात यावेळी या मतदारसंघात 61.50 टक्के मतदान झाले आहे. या मतदार संघात भाजचे जयकुमार रावल विरुद्ध संदीप बेडसे यांच्यात लढत झाली आहे.