धुळे- शहरातील वाडीभोकर रोड भागात असलेल्या एका कॅफेवर शनिवारी दामिनी पथकाने धडक कारवाई केली. पथकाने या ठिकाणाहून १० तरुण तरुणींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरातील विविध भागात असलेल्या कॅफेमध्ये अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी महाविद्यालयाच्या वेळेत जाऊन बसतात. याठिकाणी त्यांचे अश्लील चाळे सुरू असतात. अश्या तरुण तरुणींवर दामिनी पथकाने गेल्या अनेक दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारला आहे.
शनिवारी अशीच कारवाई वाडीभोकर रस्त्यावरील ट्वेल टेबल नावाच्या कॅफेवर दामिनी पथकाद्वारे करण्यात आली. याठिकाणी पथकाने १० तरुण तरुणींना ताब्यात घेतले. त्याचबरोबर कॅफे मालकावर देखील कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे महाविद्यालयीन तरुण तरुणींमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कॅफे मालकाच्या संमतीने हे प्रकार सुरू होते, अशी माहिती पथकाने दिली आहे.