ETV Bharat / state

राज्यातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहांचे सोशल ऑडिट करा - चित्रा वाघ

साक्री शहरातील शासकीय आदिवासी निवासी वसतिगृहातील पदवीच्या प्रथम वर्ष वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने वसतिगृहाच्या स्वच्छतागृहामध्ये बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात घडली. या घटनेनंतर आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विविध प्रश्न तसेच याठिकाणी चालणारा भोंगळ कारभार समोर आला. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपच्या चित्रा वाघ या शुक्रवारी धुळ्यात आल्या होत्या.

dhule

author img

By

Published : Mar 6, 2020, 8:10 PM IST

धुळे - साक्री येथील अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची घटना ही धक्कादायक असून याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची माागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच या मुलीला बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाईची मागणी वाघ यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहांचे सोशल ऑडिट करा - चित्रा वाघ

साक्री शहरातील शासकीय आदिवासी निवासी वसतिगृहातील पदवीच्या प्रथम वर्ष वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने वसतिगृहाच्या स्वच्छतागृहामध्ये बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात घडली. या घटनेनंतर आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विविध प्रश्न तसेच याठिकाणी चालणारा भोंगळ कारभार समोर आला. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपच्या चित्रा वाघ या शुक्रवारी धुळ्यात आल्या होत्या.

हेही वाचा - धक्कादायक! मुलीने वसतिगृहाच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

या प्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, साक्री येथील वसतिगृहातील झालेला प्रकार हा अतिशय धक्कादायक असून याप्रकरणी वसतिगृहातील अधिकाऱ्यांवर तसेच विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी. तसेच याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून दोषी तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

हेही वाचा - अपसंपदा प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची आमदारांची मागणी, धुळे महापालिकेत खळबळ

दरम्यान, या प्रकरणात जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली. राज्यातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे सोशल ऑडिट करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.