ETV Bharat / state

धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता - धुळे जिल्हा परिषद निवडणूक निकाल

धुळे जिल्हा परिषदेच्या 56 जागांपैकी सर्वाधिक 31 जागा भाजपने जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनाच्या महाविकास आघाडीचा येथे दारूण पराभव झाला.

भाजपची एक हाती सत्ता
भाजपची एक हाती सत्ता
author img

By

Published : Jan 9, 2020, 10:13 AM IST

धुळे - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या 56 जागांपैकी सर्वाधिक 31 जागा भाजपने जिंकल्या. राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनाच्या महाविकास आघाडीचा येथे दारूण पराभव झाला.

धुळे जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर बुधवारी मतमोजणी पार पडली. भाजपने शिरपूर तालुक्यात 10, शिंदखेडा तालुक्यात 8, साक्री तालुक्यात 3 आणि धुळे तालुक्यात 10 याप्रमाणे 31 गटात विजय मिळवला. काँग्रेसने 5, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि शिवसेनेने 3 गटांमध्ये विजय मिळवला तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले.

हेही वाचा - ..म्हणून भाजपच्या बालेकिल्ल्याला पडले भगदाड; 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट!

बहुमतासाठी लागणाऱ्या जागा घेऊन भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे भाजपचा विजय धुळे जिल्ह्याच्या राजकारणात ऐतिहासिक मानला जात आहे. धुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेससोबत सत्ता गाजवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत दारूण पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आणि माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्या पराभवाने सर्वात मोठा धक्का बसला. किरण शिंदे यांचा भाजपच्या संग्राम पाटील यांनी पराभव केला तर किरण पाटील यांना आर्वी गटात भाजपच्या शोभा पाटील यांनी पराभूत केले.

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता

धुळे तालुक्यातील 15 गटांपैकी भाजपने अकरा गट आपल्याकडे खेचून घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात एकही जागा जिंकता आली नाही. शिरपूर तालुक्यात 14 गटांपैकी भाजपने सर्वच 14 गटांमध्ये विजय मिळवला. माजी मंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिंदखेडा तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. शिंदखेडा तालुक्यात दहापैकी आठ गटांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले.

शिरपूर पंचायत समिती -

शिरपूर पंचायत समितीवर माजी मंत्री रमेश पाटील यांचा प्रभाव दिसून आला. 28 पैकी 26 गणांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामकृष्ण विठोबा महाजन हे एकमेव उमेदवार येथे विजयी झाले. कोळित गणातून सुशिलाबाई कांतीलाल पावरा या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या. निवडणुकीपूर्वीच पंचायत समितीचे वाघाडी आणि बाणी हे दोन गण भाजपने बिनविरोध ठेवले होते.

धुळे पंचायत समिती -

धुळे पंचायत समितीवर सुद्धा भाजपने स्वबळावर विजयाचा झेंडा फडकवला आहे. पंचायत समितीच्या 20 जागा भाजपने जिंकल्या असून शिवसेनेला 5, काँग्रेसला 4 आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

शिंदखेडा पंचायत समिती -

शिंदखेडा तालुक्यात पंचायत समितीच्या 20 पैकी 15 गणांत विजय मिळवत भाजपने सत्ता स्थापन केली. शिंदखेडा तालुक्यात माजी मंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठा विजय मिळवला. आमदार जयकुमार रावल यांनी भाजपचा गड म्हणून मागील दहा वर्षात शिंदखेडा तालुक्याची ओळख तयार केली. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील भाजपने पंचायत समितीवर बहुमताने विजय मिळवला होता. हातनूर, विखरण, मालपूर, निमगूळ, खरदे, धमाणे नरडाणे, वालखेडा, खलाने, चिमठाणे, शेवाळे आणि वर्षी या पंधरा गणात भाजपने विजय मिळवला आहे.

Intro:धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपने एक हाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीचं पानिपत केल आहे. जिल्हा परिषदेच्या 15 गटांपैकी 11 जागांवर तर पंचायत समिती च्या 30 गणांपैकी 20 जागांवर विजय मिळवत भाजपने हा विजय मिळवला आहे.

Body:धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय प्राप्त करी स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. 56 गटांपैकी सर्वाधिक 31 जागा जिंकत भाजपने विजयी घोडदौड सुरू केली आहे. राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महा विकास आघाडीचे पानिपत झाला आहे. जिल्हा परिषदेसह धुळे, शिरपूर,शिंदखेडा पंचायत समित्यांवर ही भाजपने विजयाचा झेंडा फडकवला आहे. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर बुधवारी मतमोजणी पार पडली. धुळे जिल्हा परिषदेच्या 56 जागांपैकी 53 जागांचे निकाल स्पष्ट झाले, त्यात सर्वाधिक 31 जागा भाजपाने जिंकल्या, भाजपने शिरपूर तालुक्यात 10 शिंदखेडा तालुक्यात 8 साक्री तालुक्यात 3 आणि धुळे तालुक्यात 10 याप्रमाणे 31 गटात विजय मिळविला आहे. तर काँग्रेसने 5 राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि शिवसेनेने 3 गटांमध्ये विजय मिळवला.महा विकास आघाडीला आतापर्यंत दहा जागा मिळाल्याचे स्पष्ट झाल आहे तसेच दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. बहुमतासाठी लागणाऱ्या अधिक जागा जिंकत भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे भाजपचा विजय धुळे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात ऐतिहासिक मानला जात आहे. धुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेस सोबत सत्ता गाजवणारा राष्ट्रवादी काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आणि माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्या पराभवाने बसला आहे किरण शिंदे यांचा कुसुंबा गटात भाजपच्या संग्राम पाटील यांनी पराभव केला तर किरण पाटील यांना आर्वी गटात भाजपच्या शोभा पाटील यांनी पराभूत केले आहे धुळे तालुक्यातील 15 गटांपैकी भाजपने तब्बल अकरा गट आपल्याकडे खेचून घेतले आहे राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात एकही जागा जिंकता आली नाही शिरपूर तालुक्यात 14 गटांपैकी भाजपने सर्व 14 गटांमध्ये विजय मिळवण्याचे स्पष्ट होत आहे निवडणुकीपूर्वीच माजी मंत्री अमरिश पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे उमेदवार झाले होते आज मतमोजणी उर्वरित सर्व जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर राहिले काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खाते उघडता आले नाही. तर शिंदखेडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दहापैकी आठ गटांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिंदखेडा तालुक्यात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे साक्री तालुक्यात सर्वाधिक 17 गट आणि 34 गणांसाठी निवडणूक झाली असून मतमोजणी संथगतीने सुरू असल्याचे दिसून आले. साक्री तालुक्यात भाजपने तीन जागा जिंकल्या होत्या, त्यात मंगल सुरेश पाटील विजयी झाले आहेत तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे चिरंजीव हर्षवर्धन दहिते हे देखील विजयी झाले आहेत.

शिरपूर पंचायत समिती:

शिरपूर पंचायत समितीवर माजी मंत्री रमेश पाटील यांचा पुन्हा करीष्मा दिसून आलाय 28 पैकी तब्बल 26 गणांमध्ये भाजपाचे उमेदवार विजयी झाले काँग्रेसला खाती उघडता आले नाही केवळ सिंग आवरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामकृष्ण विठोबा महाजन हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहे तर कोळित गणातून सुशिलाबाई कांतीलाल पावरा अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत निवडणुकीपूर्वीच पंचायत समितीचे वाघाडी आणीबाणी हे दोंगण भाजपने बिनविरोध निवडून आणले होते आजच्या निकालाने माजी मंत्री अमरीश भाई पटेल यांची तालुक्यामधील पकड कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धुळे पंचायत समिती:

धुळे जिल्हा परिषदे पाठोपाठ धुळे पंचायत समितीवर सुद्धा भाजपने स्वबळावर विजयाचा झेंडा फडकवला आहे. पंचायत समितीच्या 20 जागा भाजपाने जिंकल्या असून शिवसेनेला पाच काँग्रेसला चार तर एक अपक्ष विजयी झाले आहे.

शिंदखेडा पंचायत समिती:

शिंदखेडा तालुक्यात पंचायत समितीच्या 20 पैकी 15 गणात विजय मिळवत भाजपने एक हाती सत्ता स्थापन केली आहे. शिंदखेडा तालुक्यात माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठा विजय प्राप्त करीत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध दाखवून दिले आहे. आमदार जयकुमार रावल यांनी भाजपचा गड म्हणून गेल्या दहा वर्षात शिंदखेडा तालुक्याची ओळख तयार केली आहे, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील भाजपने पंचायत समितीवर बहुमताने विजय मिळवला होता. यंदा सत्ता कायम राखली आहे, शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी असे महा आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर बेटावद गणात अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. हातनूर, विखरण, मालपुर, निमगूळ, खरदे, धमाणे नरडाणे, वालखेडा, खलाने, चिमठाणे, शेवाळे आणि वर्षी या पंधरा गणात भाजपने विजय मिळवीत पंचायत समितीतील सत्ता काबीज केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.