धुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे उमदेवार देतील, त्या उमेदवाराला प्रचंड ताकदीने निवडून आणण्याची शंभर टक्के जबाबदारी ही भाजपची असेल, असं मोठं विधान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP state president Chandrasekhar Bawankule ) यांनी सोमवारी धुळ्यात पत्रकार परिषदेत ( Chandrasekhar Bawankule criticized NCP ) केलं. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर देखील प्रहार केला. राष्ट्रवादी हा नेत्यांनी तयार केलेली एक कुडी आहे. त्या कुडीतून झालेला हा पक्ष आहे. ज्याठिकाणी नेते आहे त्याठिकाणी राष्ट्रवादी आहे. नेता गेला का राष्ट्रवादी गेली. त्यामुळे त्या पक्षाला (राष्ट्रवादीला ) व्हिजन नाहीये. अशी टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.
यांची धुळ्यातील पत्रकार परिषद ( press conference Dhule ) पंकजाताई मुंडे या पक्षासाठी पूर्णवेळ काम करताय. त्या पक्षाच्या देशाच्या सचिव आहेत पंकजाताई मुंडे यांच्या संदर्भात ज्या कल्पोकल्पित बातम्या येत आहेत, त्या बंद व्हायला पाहिजेत. असं मतं यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केलं. ठाकरे सरकारचं नांव न घेता भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. या पूर्वीच्या सरकारच्या काळात एका विभागाचा निधी दुसऱ्या विभागासाठी वळवण्याचं कामं झालंय. असं बावनकुळे यावेळी ( Bawankule criticized NCP in press conference Dhule ) म्हणालेत.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सोमवारी १२ सप्टेंबरला धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद, कार्यकर्ता मेळावा, पक्षाच्या कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्याशी संवाद, चर्चा, तैलिक समाज बांधवाच्या मेळाव्याला उपस्थिती असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.