ETV Bharat / state

रस्त्याच्या कामासाठी वापरलेल्या मुरुमाची नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकऱ्याचा स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न - धुळ्यात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामासाठी वापरण्यात आलेला मुरुम एका शेतकऱ्याच्या शेतातून चोरून नेल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. वारंवार अर्ज करूनही शेतकऱ्याला नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकऱ्याने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केला.

Attempt of self-immolation in front of Dhule District Collector

author img

By

Published : Aug 15, 2021, 3:12 PM IST

Updated : Aug 15, 2021, 3:28 PM IST

धुळे - शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे शिवारात असलेल्या शेतामधील मुरुम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामासाठी वापरण्यात आला होता. शासनाने दिलेल्या टेंडर संबंधित कंपनी काम करीत आहे. त्याला लागत असलेल्या मुरुमासाठी त्यांनी शहादु निवृत्ती तांबे या मेंढपाळ शेतकऱ्याच्या शेतामधून सदर शेतकऱ्याची कुठलीही परवानगी न घेता मुरूम हा चोरून नेला असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

शेतकऱ्याचा स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न
शासनाने त्याच्या शेतातील मुरुम चोरी संदर्भात नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रशासनाकडे वारंवार अर्ज करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. मात्र शहादु निवृत्ती तांबे यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच ठेकेदारावर देखील गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे आज त्यांनी स्वातंत्रदिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदर शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

Last Updated : Aug 15, 2021, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.