ETV Bharat / state

धुळ्यात लोकसभा निवडणुकीत अनिल गोटेंना फक्त 8 हजार मते; राजकीय अस्तित्व संपणार का? - राजकीय अस्तित्व

गोटे यांना या निवडणुकीत फक्त 8 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील पराभवामुळे अनिल गोटे यांचे राजकीय अस्तित्व संपतंय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

धुळ्यात लोकसभा निवडणुकीत अनिल गोटेंना फक्त 8 हजार मते; राजकीय अस्तित्व संपणार का?
author img

By

Published : May 25, 2019, 12:57 PM IST

धुळे - धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे विजयी झाले आहेत. डॉ. भामरे यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांचा पराभव केला. तर या निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हेही होते. परंतु गोटे यांना या निवडणुकीत फक्त 8 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील पराभवामुळे अनिल गोटे यांचे राजकीय अस्तित्व संपतंय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

धुळ्यात लोकसभा निवडणुकीत अनिल गोटेंना फक्त 8 हजार मते; राजकीय अस्तित्व संपणार का?

धुळे लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुभाष भामरे आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यात लढत होती. यासोबत याठिकाणी आणखी एक उमेदवार चर्चेचा विषय ठरला ते म्हणजे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे. अनिल गोटे यांनी देखील या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करतानाच स्वतःच्या विजयासाठी नव्हे, तर डॉ. भामरे यांच्या पराभवसाठी उमेदवारी दाखल करत असल्याचे सांगितले होते.

गेल्या 10 वर्षांपूर्वी देखील अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 25 हजार मते मिळाली होती. त्यामुळे याही निवडणुकीत अनिल गोटे हे चांगली मते मिळवतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या निवडणुकीत त्यांना फक्त 8 हजार मते मिळाली. त्यामुळे अनिल गोटे यांच्या पराभवाची कारणे पाहता, त्यांनी या निवडणुकीत भामरे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच त्यांनी या निवडणुकीत मतदारांसमोर जाताना विकासाचा कोणताही अजेंडा नेला नाही. फक्त द्वेषाचे राजकरण करत त्यांनी संपूर्ण प्रचार केला. यामुळे अनिल गोटे यांना या निवडणुकीत मतदारांनी अत्यंत कमी मते देऊन पराभूत केले.

या निवडणुकीच्या निकालानंतर अनिल गोटे यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भामरेंना पराभूत करण्याच्या उद्देशाने गोटेंनी खेळलेला डाव त्यांच्यावरच उलटला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे आपले राजकीय अस्तित्व टिकवणार का? विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:धुळे लोकसभा मतदार संघातून भाजपचे डॉ सुभाष भामरे हे विजयी झाले. डॉ सुभाष भामरे यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांचा पराभव केला. मात्र या निवडणुकीत भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली होती. मात्र अनिल गोटे यांना धुळे लोकसभा मतदार संघातून फक्त ८ हजार मते मिळाली. या पराभवामुळे अनिल गोटे यांचं राजकीय अस्तित्व संपतंय का ? आणि काय आहेत अनिल गोटे यांच्या पराभवाची कारणे यावर ईटीव्ही भारतचा एक विशेष रिपोर्ट. Body:धुळे लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होत. धुळे लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यात लढत होती. यासोबत याठिकाणी आणखी एक उमेदवार चर्चेचा विषय ठरला ते म्हणजे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे. अनिल गोटे यांनी देखील या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली. मात्र लोकसभा निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करतांना अनिल गोटे यांनी स्वतःच्या विजयासाठी नव्हे तर डॉ सुभाष भामरे यांना पराभूत करण्यासाठी आपण उमेदवारी करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होत. गेल्या १० वर्षांपूर्वी देखील अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी त्यांना २५ हजार मते मिळाली होती. याही निवडणुकीत अनिल गोटे हे चांगली मते मिळवतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र या निवडणुकीत त्यांना फक्त ८ हजार मते मिळाली. अनिल गोटे यांच्या पराभवाची कारणे पाहता त्यांनी या निवडणुकीत डॉ सुभाष भामरे यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली, तसेच त्यांनी या निवडणुकीत मतदारांसमोर जातांना विकासाचा कोणताही अजेंडा नेला नाही. फक्त द्वेषाचं राजकरण करत त्यांनी संपूर्ण प्रचार केला. यामुळे अनिल गोटे यांना या निवडणुकीत मतदारांनी अत्यंत कमी मते देऊन पराभूत केले. या निवडणुकीच्या निकालानंतर अनिल गोटे यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे कि काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डॉ सुभाष भामरे यांना पराभूत करण्याच्या उद्देशाने अनिल गोटे यांनी खेळलेला डाव त्यांच्यावरच उलटला आहे असच म्हणावं लागेल . आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे हे आपलं राजकीय अस्तित्व टिकवताय का ? विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळेल का ? हे आगामी काळात बघणं महत्वाचं ठरणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.