ETV Bharat / state

Anil Gote : 'भाजप सोडले, कमळ नाही'; अनिल गोटेंनी केली ६७ प्रकारच्या कमळाची लागवड - राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे

धुळे शहराचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे ( NCP State Vice President Anil Gote ) यांनी ८ एप्रिल २०१९ ला भाजपला अलविदा केलं. धुळे शहरापासून सात किलोमीटर अंतरावर अनिल गोटे ( Anil Gote Farm House ) यांचं शेत आहे. या शेतात विविध पिकं, फुलं , फळझाडं आहेत . मल्हार बाग म्हणून हा परिसर परिचित आहे . याठिकाणी अनिल गोटे यांनी १५ वर्षांपूर्वी आपल्या शेतात कमळ फुलाच्या ६७ प्रकारांची यशस्वी लागवड केलीय.

Anil Gote left BJP, not lotus
अनिल गोटे यांनी भाजप सोडले, कमळ नाही,
author img

By

Published : Jul 11, 2022, 8:52 PM IST

Updated : Jul 11, 2022, 10:10 PM IST

धुळे - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या काळात ८ एप्रिल २०१९ या दिवशी अनिल गोटे ( Anil Gote )यांनी आमदार पदाचा राजीनामा देत, भाजपला सोडचिठ्ठी दिली. सध्या अनिल गोटे हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ( NCP State Vice President Anil Gote ) आहेत. अनिल गोटे यांनी भाजपला सोडलं असलं तरी कमळची साथ सोडलेली दिसत नाही. धुळे शहराचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी ८ एप्रिल २०१९ ला भाजपला अलविदा केलं. त्यानंतर त्यांनी धुळे लोकसभा मतदार संघातून, नंतर धुळे शहर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी केली होती. असं असलं तरी अनिल गोटे यांनी भाजप सोडलं मात्र, कमळ नाही सोडलं.

अनिल गोटे यांनी १५ वर्षांपूर्वी आपल्या शेतात कमळ फुलाच्या ६७ प्रकारांची यशस्वी लागवड केली

६७ प्रकारांची यशस्वी लागवड - धुळे शहरापासून सात किलोमीटर अंतरावर अनिल गोटे यांचं शेत आहे. या शेतात विविध पिकं, फुलं , फळझाडं आहेत . मल्हार बाग म्हणून हा परिसर परिचित आहे . याठिकाणी अनिल गोटे यांनी १५ वर्षांपूर्वी आपल्या शेतात कमळ फुलाच्या ६७ प्रकारांची यशस्वी लागवड केलीय. यात १८ पाकळयांपासून १ हजार पाकळयांपर्यंतच्या कमळाचा समावेश आहे. या शिवाय ६ प्रकारचे चाफा आहेत. आवड म्हणून कमळाची लागवड केली असल्याचं अनिल गोटे सांगतात. कमळ हे कोणत्या पक्षासाठी थोडीच आहे. उद्या समाजवादी पक्ष म्हणेल सायकल आमची आहे. सायकलवर लोकांनी फिरू नये. असं काही नाही म्हणत अनिल गोटे यांनी भाजपवर टीका करत भाजपवाल्यांनी कमळ भ्रष्ट करून टाकलं असं म्हटल आहे .

Anil Gote planted 67 varieties of lotus
अनिल गोटेंनी केली ६७ प्रकारच्या कमळाची लागवड

हेही वाचा - Ashadi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त हिंदू बांधवांसाठी मुस्लिम समाजाची अशीही 'कुर्बानी'

Anil Gote's farm has various crops, flowers and fruit trees
अनिल गोटे यांच्या शेतात विविध पिकं, फुल, फळझाडे आहेत

कमळ लक्ष्मीचं निवास स्थान मात्र, भाजपवाल्यांनी कमळाचे पावित्र्य घालवून टाकलं. चिखलात कमळ उमलत मात्र, त्याला चिखलाचा डाग नसतो. भाजपवाल्यांची कमळ चिखलाने भरली असल्यानं ती शोधावी लागतात. असा टोलाही अनिल गोटे यांनी लगावलाय . पंधरा वर्षांपूर्वी देशाच्या विविध भागातून कमळाची कंद आणून लागवड केल्याचं ते सांगतात. कमळ लागवडीसाठी त्याला जास्त चिखलाची तर पुरेश्या पाण्याची आवशकता असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं. अगदी सहा इंच पाण्यात देखील कमळ लावता येतं. मात्र, त्यात चिखलाचे प्रमाण अधिक हवं असंही अनिल गोटे म्हणाले. उत्पन्न म्हणून नव्हे तर आवड म्हणून कमळाची लागवड केल्याचं गोटे सांगतात. लोक येतात कमळाची कंद, फुले नेत असतात. राष्ट्रीय फुल, प्राण्यांचे चिन्ह राजकीय पक्षांचे चिन्ह झाली आहेत. यावर काय तक्रार करणार, असं म्हणत गोटे यांनी हे सर्व तक्रार करण्याच्या पलीकडे गेलं आहे. या सगळ्यांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं आहे असं म्हणत त्यांनी मनसेवर देखील निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा हे कोणी पक्षाच्या चिन्हासाठी वापरत असेल तर, तुम्ही तिथं काय करणार ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. यासाठी ज्यानं-त्यानं स्वतःहून बंधन पाळायला हवीत असं मतही गोटे यांनी व्यक्त केलं.

Successful planting of 67 varieties of lotus flowers in the field
शेतात 67 प्रकारच्या कमळ फुलांची यशस्वी लागवड

किती पुढारी खरोखर शेती करतात - निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये व्यवसाय म्हणून शेती लिहणारे किती पुढारी खरोखर शेती करतात हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, अनिल गोटे हे स्वतः शेती करतात. त्यांच्या या शेतात गांडूळ खत प्रकल्प , शेळी पालन , कुकुटपालन , कडकनाथ कुकुटपालन , विविध प्रकारच्या गायी , म्हशी , त्याचप्रमाणे आंबा बाग , हळद शेती अशी पूरक शेती याठिकाणी पहावयास मिळते. ९० टन ओली हळद, ९० टन कलिंगडचं उत्पादन घेतल्याचे अनिल गोटे सांगतात. हळदीचं बियाणं बाजारभावापेक्षाही कमी दरात ते शेतकऱ्यांना देतात. हळद ही अँटिबायोटिक असल्यानं हळद लागवड जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावी. असं आवाहनही अनिल गोटे यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं.

हेही वाचा - CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोलीतील पूरपरिस्थितीचा आढावा

Last Updated : Jul 11, 2022, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.