धुळे - दिवाळीच्या दिवशी धातूच्या ग्लासमध्ये फटाके फोडतांना ( bursting crackers ) १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याच्या घटना धुळे शहरात ( One dies while bursting crackers ) घडली. जुने धुळे भागातील १५ वर्षीय सोनू कैलास जाधव या मुलाचा दिवाळीच्या दिवशी फटाके ( Death while bursting firecrackers on Diwali ) फोडताना मृत्यू ( Death while bursting firecrackers ) झाला. या संदर्भात त्याच्या आजोबांनी आझाद नगर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यू अन्वये नोंद करण्यात आली.
आबा धाकलू पवार या ५८ वर्षीय आजोबांनी आझाद नगर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा १५ वर्षीय नातू सोनू कैलास जाधव हा दिवाळीच्या दिवशी घरासमोर रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान धातूच्या ग्लासमध्ये फटाके फोडत होता. त्यांने फटाका ग्लासमध्ये ठेवल्यानंतर धातूच्या ग्लासचा स्फोट झाला. ग्लासच्या स्फोटामुळे त्याच्या छातीत ग्लासचा पत्रा घुसला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.