धुळे - विधानसभा निवडणुकीत मतदान करतानाचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल करत असल्याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसारित केली. यानंतर हर्षल नावाच्या तरुणावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेवेळी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी घातलेली असताना देखील धुळे शहरातील काही मतदान केंद्रांवर उमेदवारांचे कार्यकर्ते सर्रासपणे मोबाईलने शुट करत होते. तसेच मतदान करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते समाज माध्यमावर व्हायरल करत असल्याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आरोपीला एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
मतदान हे गुप्त पद्धतीने होणे आवश्यक असताना अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत निवडणुकीचे कर्तव्य बजावताना एका 'न्यूटन'चा मृत्यू