ETV Bharat / state

सकारात्मक विचारामुळे 'त्यांनी' २१ दिवस संघर्ष करून केली कोरोनवर मात - धुळे महिला कोरोना संघर्ष बातमी

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक विचारांच्या मदतीने धुळ्यातील 47 वर्षीय सरिता पाटील यांनी २१ दिवस कोरोनाशी लढा दिला.

Dhule woman overcome from corona
धुळे कोरोनाबाधित महिला सकारात्मक विचार बातमी
author img

By

Published : May 7, 2021, 9:27 AM IST

धुळे - कोरोनाबाधीत रुग्ण आणि बळींची संख्या दररोज वाढत आहे. त्याचवेळी अनेक रुग्ण कोरोनावर मात करून घरी देखील येत आहेत. फागणे गावातील 47 वर्षीय सरिता पाटील यांनी 21 दिवस कोरोनाशी संघर्ष केला. डॉक्टरांचे प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनाला हरवून त्या सुखरूप घरी परतल्या आहेत.

सरिता पाटील यांनी सकारात्मक विचारांच्या सहाय्याने कोरोनावर मात केली

कोरोनाचे नाव घेतल्यानंतर अनेक जण गर्भगळीत होतात. अनेकांनी तर आजाराचा धसका घेऊनच मृत्यूला कवटाळले आहे. मात्र, सकारात्मकता आणि जबर इच्छाशक्तीच्या बळावर अनेक रुग्ण बरे होऊन घरी येत आहेत. धुळे शहरापासून जवळच असलेल्या फागणे येथील सरिता पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना तत्काळ जवाहर फौंडेशन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्या दिवशी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले त्या वेळेस त्याचा एचआर सिटी स्कोर 16 होता तर, ऑक्सिजन लेवल 88 वर होती. शिवाय शुगर आणि उच्च रक्तदाब याचाही त्यांना त्रास होता. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची चिंता वाढली होती. डॉक्टरांनी देखील प्रकृतीच्या काळजी पोटी त्यांना ऑक्सिजन बेडवर दाखल केले. मात्र, या कठीण कालावधीत देखील त्या आपली मुलगी आणि पती यांना दिलासा देत राहिल्या. दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच एक दिवस त्यांची ऑक्सिजन लेवल अधिक खालावली. मात्र, या परिस्थितीत देखील त्या खंबीर राहिल्या. त्यानंतर काही दिवसातच त्यांच्या प्रकृतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. 21 दिवसाच्या उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. सकारात्मकता, डॉक्टराचे प्रयत्न, मुलगी आणि पती यांचा खंबीर पाठिंबा या बळावर सरिता पाटील कोरोनाला हरवून घरी परतल्या.

भीती न बाळगता सकारात्मक विचार आणि योग्य आहार -

रुग्णालयात असताना नेहमीच नकारात्मक विचार येतात. मात्र, सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे विचलित न होता, सकारात्मक विचार केले पाहिजेत. डॉक्टर सांगत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे योग्य पालन केले पाहिजे. शिवाय योग्य आहार, मनन, चिंतन करत राहिल्यामुळे मी बरी होऊन घरी आले, असे सरिता पाटील यांनी सांगितले.

नित्य सवयी कायम ठेवल्या -

21 दिवस रुग्णालयात होते. या कालावधीत खचले नाही. रोजच्या सवयी कायम ठेवल्या. सकाळी उठल्यावर ब्रश करणे, दिवसभरात दोन वेळा चेहरा स्वच्छ धुणे. मी घरी जाईल हा जपच सुरू ठेवला, म्हणून मी कोरोनाला मात देऊन घरी आले, अस सरिता पाटील सांगतात. आपण कोरोनाची जास्त भीती बाळगली तर तो हावी होतो. घाबरू नका, धीर धरा, डॉक्टर सांगतात त्या नियमांचे पालन करा. कोरोना निश्चित हरेल आणि आपण जिंकूच, असा आशावादही सरिता यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.