ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यात 65 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांचा आकडा 562 वर - धुळ्यातील कोरोना

धुळे जिल्ह्यात रविवारी (दि. 32 जून) रात्री उशिरा हाती आलेल्या अहवालानुसार 65 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 562 वर पोहोचला असून त्यापैकी 189 जणांवर (अॅक्टीव्ह) सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jun 22, 2020, 12:21 PM IST

धुळे - जिल्ह्यात रविवारी (दि. 21 जून) तब्बल 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिरा आणखी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकाच दिवशी 65 रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना बाधितांची एकूण संख्या 562 झाली आहे. तर रविवारी दिवसभरात 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित 189 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असून यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

शासकीय रुग्णालय धुळे

धुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून रविवारी सायंकाळी 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार धुळे जिल्हा रुग्णालयातील 72 अहवालांपैकी 4 जणांचे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 31 पैकी 9 जणांचे तर, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 2 पैकी 1 जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तब्बल 14 जणांची भर पडली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 562 झाली आहे. रविवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यात 325 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 189 जणांवर उपचार सुरू आहेत.

धुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तपासणीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. रविवारी आलेल्या अहवालानुसार शहरातील मोगलाई परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून या भागातील 20 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. मागील 30 दिवसांत जिल्ह्यात 451 बाधितांची भर पडली असून एका महिन्यात 5 पटीने रुग्ण वाढले असून नागरिकांची बेफिकीरवृत्ती याला कारणीभूत ठरली आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून शिरपूर तालुका हॉटस्पॉट ठरला आह., शिरपूर तालुक्यात 151 कोरोना रुग्ण आढळले असून 72 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नव्याने रुग्ण वाढत आहेत. रविवारी (दि. 21 जून) 3 हजार 870 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर 1 हजार 59 रुग्णांनी रविवारी (दि. 21 जून) कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा - वडिलांनी मुलांशी संवाद साधायला हवा; धुळ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकांचे मत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.