ETV Bharat / state

बंद घराचे वीज बील आले ३५ हजार, वीज कंपनीचा अजब कारभार

author img

By

Published : Mar 18, 2021, 8:02 PM IST

धुळे शहरा पासून जवळच असलेल्या आर्वी येथील एका ज्येष्ठ नागरीकांच्या बंद घराचे तब्बल ३५ हजार रुपये एवढे वीज बील कंपनीने दिले आहे. शिवाय हे बील भरावेच लागेल अशी सक्तीच या व्यक्तीला करण्यात आली आहे. वीज कंपनीच्या उफराट्या कारभाराच्या विरोधात आता या नागरीकाने उपोषणाचा इशारा दिला आहे.

35000-electricity-bill-for-closed-house-
बंद घराचे वीज बील आले ३५ हजार

धुळे - वीज कंपनीने रिडींग न घेताच थोपवलेली वीज बीले भरण्याची सक्ती शासनाने केलेली आहे. ग्राहक वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणुन वीज बिलाचा भरणा देखील करत आहेत. मात्र वीज कंपनीच्या चुकीच्या बिलांचा भडीमार काही कमी होत नाही. वीज कंपनीने चुकीच्या पध्दतीने दिलेल्या बिलाचा भरणा करण्याची देखील सक्ती ग्राहकांना करण्यात येत आहे.

बंद घराचे वीज बील आले ३५ हजार

धुळे शहरा पासून जवळच असलेल्या आर्वी येथील एका ज्येष्ठ नागरीकांच्या बंद घराचे तब्बल ३५ हजार रुपये एवढे वीज बील कंपनीने दिले आहे. शिवाय हे बील भरावेच लागेल अशी सक्तीच या व्यक्तीला करण्यात आली आहे. वीज कंपनीच्या उफराट्या कारभाराच्या विरोधात आता या नागरीकाने उपोषणाचा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषदेतुन निवृत्त झालेले सुकलाल दगा धनराय शहरात वास्तव्यास आहेत. शहरा पासून जवळच असलेल्या आर्वी येथे त्यांनी मागील वर्षी घराचे बांधकाम केले. या घरात पत्नी इंदुबाई धनराज यांच्या नावाने वीज जोडणी घेतली आहे .बंद असलेल्या या घरात विजेचा वापरच नसल्यामुळे त्यांनी फेब्रुवारी महिन्यात वीज कर्मचाऱ्यांला सांगून वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर जुलै महिन्यात परस्पर वीज पुरवठा सुरु करण्यात आला. जुलै पासून डिसेबंरपर्यंत बंद असलेल्या घराचे वीज देयक १०० ते ३०० रुपयांपर्यँत येत होते. हे वीज देयक धनराय अदा करत होते. मात्र मार्च २०२० पासून ते डिसेबंर २०२० पर्यंत धनराय यांच्या घराचा वीज वापर कमीत कमी ७ युनिट ते जास्तीत जास्त २० युनिट दाखविण्यात आला आहे. ही सर्व बिल अंदाजेच देण्यात येत होती. यानंतर जानेवारी महिन्यात तब्बल एक हजार ८८३ युनिट वापर दाखवत थेट २६ हजार ४३० रुपयांचे वीज बिल थोपविण्यात आले.

या संदर्भात धनराय यांनी तक्रार केली. यानंतर वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याने पडताळणीदेखील केली. या पडताळणीत वीज मीटर बंद असून वापर नसल्याचा अहवाल देखील देण्यात आला. वीज बिल कमी होईल अशी अपेक्षा असताना जानेवारी महिन्याचे एक हजार ८८३ युनीटची थकबाकी दाखविण्यात आली. शिवाय फेब्रुवारी महिन्यात चक्क ६३८ युनीट वीज वापर दाखवत ३४ हजार ३५० रुपयांचे वीज बील थोपवण्यात आले आहे. या अवाजवी आणि सदोष यंत्रणेच्या विरोधात धनराय यांनी पुन्हा तक्रार केली आहे. मात्र वीज कंपनीचे शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता किंवा अधिक्षक अभियंता या पैकी कोणीच दखल घेण्यास तयार नाही. वीज कंपनीच्या दोषी यंत्रणेने चुकीचे बील थोपवले हे कमी करणे तर दूरच आता वीज कंपनीने धनराय यांच्या घराचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. या विरोधात त्यांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आणखी एक जण ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.