धुळे - महापालिकेने एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत सुमारे 25 कोटी 70 लाख रुपयांची वसुली मालमत्ता करातून केली आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 4 कोटी रुपयांचा अधिक भरणा झाला आहे. यातून महापालिकेच्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
धुळे महापालिकेत मालमत्ता करातून एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत सुमारे 25 कोटी 70 लाख रुपयांची वसुली झाली आहे. तर विविध माध्यमातून मालमत्ताधारकांना सुमारे 4 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
हेही वाचा - विमानतळाबरोबरच शहरालाही संभाजी महाराजांचे नाव द्या - संभाजीराजे भोसले
शहरात सुमारे 1 लाखाहून अधिक मालमत्ता आहेत. त्यात हद्दवाढ क्षेत्राची भर पडली आहे. शहरातील मालमत्तांची माहिती संगणकीकृत असून हद्दवाढ क्षेत्रातील माहितीच्या संगणकीकरणाचे काम सुरू आहे. मालमत्ता कर भरणे सुलभ व्हावे, यासाठी मालमत्ता विभागासाठी धुळे इकनेक्ट अॅप वापरले जात आहे. ऑनलाइन कराचा भरणा करता येत असल्याने कर भरण्यासाठी मनपाच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
मालमत्ता विभागाकडे उपलब्ध आकडेवारीवरून एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत मागील करातून 12 कोटी 56 लाख 15 हजार 443 रुपये व चालू मागणीतील 13 कोटी 14 लाख 77 हजार 166 रुपये असे एकूण 25 कोटी 70 लाख 92 हजार 600 रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. तर सन 2019 मध्ये फेब्रुवारी अखेर 21 कोटी 73 लाख 90 हजार 380 रुपयांची वसुली झाली होती. यावरून चालू वर्षात सुमारे 3 कोटी 97 लाख 2 हजार 229 रुपयांची वसुली झाली आहे. सन 2019 मार्च अखेर 27 कोटी 27 लाख 10 हजार 131 रुपयांची वसुली झाली होती. तर यावर्षी मार्च अखेरपर्यंत 100 टक्के वसुलीचे उद्धिष्ट गाठण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
हेही वाचा - मोडून पडला संसार..! आदिवासी वस्तीत आग लागून ११ झोपड्या जळाल्या