धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमीदारामार्फत याबाबत टिप मिळाली होती. जी. जे. ०८ ए. यु. २३५८ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये बेकायदेशीरित्या विदेशी दारूचे खोके भरण्यात आले असून, हे वाहन हे दिल्ली येथून मुंबईकडे धुळेमार्गे जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीर पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी केली. यानंतर धुळ्याकडे येणारी वाहने तपासणी करायला सुरुवात केली.
कंटेनरमध्ये आढळला मद्यसाठा: संशयित कंटेनर दिसल्याने त्यास अडथळा करून थांबविले. त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रमेश मुंशीराम कुमार (वय, ४५, रा. जि. इसहार, हरियाणा) असे सांगितले. कंटेनरमधील मालाविषयी विचारपूस केली असता, चालकाने उडवाउडवीची माहिती दिली. कंटेनरमधील मालाचा उग्र वास येत असल्याने कंटेनर चालकासह पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणला गेला. येथे कंटेनरमधील मालाची तपासणी करता त्यात मद्यसाठा आढळून आला.
कंटेनर जप्त: गुन्हे अन्वेषण पथकाने १० लाख रुपये किंमतीचा कंटेनर देखील जप्त केला आहे. संशयित कंटेनर चालकाविरुद्ध सोनगीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू: संशयित आरोपीने सदरचा माल कुठून आणला व डिलेवरी कुठे देणार होता, या चेनमध्ये आणखी कोण आरोपी आहेत, याबाबत विचारपूस सुरू आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई: ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रकाश पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप खोंडे, हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, संतोष हिरे, प्रकाश सोनार, मयूर पाटील, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, मायुस सोनवणे, प्रशांत चौधरी, देवेंद्र ठाकूर, योगेश साळवे आदींनी केली.
हेही वाचा: