चंद्रपूर- कोरपना तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. युवकाने आज वणी तालुक्यातील पात्र येथील पैनगंगा नदीत आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. विकास गजानन सोयाम असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून या घटनेमुळे त्याच्या गावात शोककळा पसरली आहे.
विकास हा शेत मजूरीसाठी वणी तालूक्यातील पात्र गावात गेला होता. त्याचे वडील गजानन रावजी सोयाम यांच्यावर २.५ लाखाचे कर्ज आहे, तर त्याची आजी किसनाबाई रावजी सोयाम यांच्या नावावर ३.५ लाखाचे कर्ज आहे. या कर्जामुळे विकासचे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त होते. त्यामुळे, आज विकासने पैनगंगा नदीच्या पात्रता उडी घेवून आत्महत्या केल्याचे समजले आहे.
हेही वाचा- लग्न पत्रिकेतून दिला सामाजिक संदेश, चंद्रपुरातील तरुणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम