ETV Bharat / state

मनसे नेत्यांच्या दबावामुळे दिली तक्रार, तक्रारकर्त्या  तरुणीची कबुली; विनयभंग प्रकरणाला धक्कादायक वळण

धोटे यांनी असा कोणताही  प्रकार केला नसून विनाकारण त्यांचे नाव गोवण्याची युवतीची मनस्थिती नव्हती. युवतीचे छेड केल्याप्रकरणी नर्सिंग महाविद्यालयाचा प्राचार्य गुरुराज कुलकर्णी याला शाळेतून काढून टाकले गेले होते.

author img

By

Published : May 22, 2019, 11:47 PM IST

मनसे नेत्यांच्या दबावामुळे मी तक्रार दिली

चंद्रपूर - विनयभंगाच्या आरोपाखाली काल अटक करण्यात आलेले चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे व राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याविरुद्ध बळजबरीने तक्रार द्यायला लावल्याचा आरोप तक्रारदार मुलीने चंद्रपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. पोलीस अधीक्षकांकडे दिलेली तक्रार परत घेणार असल्याचे युवतीने म्हटले आहे.

चंद्रपूर मनसेचे राजू कुकडे, राजुरा येथील गोमती पाचभाई व चंद्रपूर येथील मनसे महिला जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी ५ लाख रुपयांचे आमिष देऊन मला सुभाष धोटे व अरुण धोटे यांचे तक्रारीत नाव समावेश करावे, यासाठी बळजबरी केली असल्याचा आरोप पीडित मुलीने पत्रकार परिषदेत केला आहे. पीडित मुलगी आदिलाबादला असताना सुनीता गायकवाड यांनी तिला फोन केला की, ८ महिन्यापूर्वी झालेले प्रकरण आपण बाहेर काढू आणि त्याबदल्यात तुला ५ लाख रुपयाचे मदत देऊ आणि तुझे इतर नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश करून देऊ. आमिषाला बळी पडून पीडित मुलगी चंद्रपूर येथे आली. चंद्रपूर येथे आल्यानंतर सुनीता गायकवाड हिच्या घरी मनसे नेते उपस्थित होते. १८ मे रोजी मी तिथे पोचल्यावर मला केवळ जुने प्रकरण आपण उचलू अशा पद्धतीची विनंती करून बोलवण्यात आले. मात्र त्यानंतर तिथे पाहीले तर प्रकार वेगळाच होता. त्यांनी संस्थाध्यक्ष सुभाष धोटे व संस्था सचिव अरुण धोटे यांच्याविरोधात तक्रार करावी लागेल असे सांगितले. त्यांच्या विरोधात तक्रार केली तर तुझे शैक्षणिक नुकसान होणार नाही व ते तुला मदत करेल. अन्यथा इतर नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश होणार नाही अशा पद्धतीचे आमिष मला देण्यात आले. युवतीने असे करण्यास स्पष्ट नकार दिला.

धोटे यांनी असा कोणताही प्रकार केला नसून विनाकारण त्यांचे नाव गोवण्याची युवतीची मनस्थिती नव्हती. युवतीचे छेड केल्याप्रकरणी नर्सिंग महाविद्यालयाचा प्राचार्य गुरुराज कुलकर्णी याला शाळेतून काढून टाकले गेले होते. यानंतरही मी त्यांच्या नावाची तक्रार कशी काय करू असे म्हटल्यानंतर मला रात्रभर त्यांच्या घरी मुक्कामी ठेवले गेले. राजू कुकडे यांनी कागदावर संगणीकृत लिखाण करून आणले. मला तू जे लिहिलं तुझे सांगितलं तेच मी लिहिलं अशा पद्धतीचे सांगून वाचायला न देता त्यावर माझी सही घेतली, आणि पोलीस अधीक्षकांकडे गेलो आणि तिथे तक्रार केली. यामध्ये संस्थाध्यक्ष सुभाष धोटे, सचिव अरुण धोटे त्यांचा ड्रायव्हर व इतर कोणाचाही कसलेही प्रकारचा हस्तक्षेप नाही. असा खुलासा या युवतीने केला आहे.

चंद्रपुर : विनयभंगाच्या आरोपाखाली काल अटक करण्यात आलेले चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे व राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याविरुद्ध बळजबरीने तक्रार द्यायला लावली असल्याचा आरोप तक्रारदार मुलीने चंद्रपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. पोलिस अधीक्षकांकडे दिलेली तक्रार परत घेणार असल्याचे युवतीने म्हटले आहे. 

 चंद्रपूरचे मनसेचे राजू कुकडे, राजुरा येथील गोमती पाचभाई व चंद्रपूर येथील मनसे महिला जिल्हाध्यक्षा सुनिता गायकवाड यांनी पाच लाख रुपयांचे आमिष देऊन मला सुभाष धोटे व अरुण धोटे यांचा तक्रारीत नाव समावेश करावे यासाठी बळजबरी केली असल्याचा आरोप पीडित मुलीने  पत्रकार परिषदेत केला आहे. पीडित मुलगी आदिलाबादला असताना सुनिता गायकवाड यांनी तिला फोन केला की, आठ महिन्यापूर्वी झालेले प्रकरण आपण बाहेर काढू आणि त्याबदल्यात तुला पाच लाख रुपयाचे मदत देऊ आणि तुझे इतर नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश करून देऊ. आमिषाला बळी पडून पीडित मुलगी चंद्रपूर येथे आली. चंद्रपूर येथे आल्यानंतर सुनिता गायकवाड हिच्या घरी मनसे नेते उपस्थित होते. १८ मे ला मी तिथे पोचल्यावर  मला केवळ जुने प्रकरण आपण उचलू अशा पद्धतीची विनंती करून बोलवण्यात आले. मात्र त्यानंतर तिथे पाहीले तर प्रकार वेगळाच होता. त्यांनी  संस्थाध्यक्ष सुभाष धोटे व संस्था सचिव अरुण धोटे यांच्याविरोधात तक्रार करावी लागेल असे सांगितले. त्यांच्या विरोधात तक्रार केली तर तुझं शैक्षणिक नुकसान होणार नाही व ते तुला मदत करेल. अन्यथा इतर नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश होणार नाही अशा पद्धतीचे आमिष मला देण्यात आले. युवतीने असे करण्यास स्पष्ट नकार दिला. धोटे यांनी असा कोणताही  प्रकार केला नसून विनाकारण त्यांचे नाव गोवण्याची युवतीची मनस्थिती नव्हती. युवतीचे छेड केल्या प्रकरणी नर्सिंग महाविद्यालयाचा प्राचार्य गुरुराज कुलकर्णी याला शाळेतून काढून टाकले गेले होते. यानंतरही मी त्यांच्या नावाची तक्रार कशी काय करू असे म्हटल्यानंतर मला रात्रभर त्यांच्या घरी मुक्कामी ठेवले गेले. राजू कुकडे यांनी कागदावर संगणीकृत लिखाण करून आणले. मला तू जे लिहिलं तुझे सांगितलं तेच मी लिहिलं अशा पद्धतीचे सांगून वाचायला न देता त्यावर माझी सही घेतली. आणि एसपी साहेबांकडे गेलो आणि तिथे तक्रार केली. यामध्ये संस्थाध्यक्ष सुभाष धोटे, सचिव अरुण धोटे त्यांचा ड्रायव्हर व इतर कोणाचाही कसलेही प्रकारचा हस्तक्षेप नाही. असा खुलासा या युवतीने केला आहे. 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.