चंद्रपूर - लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने झडप घातल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. माळकुटी नवेगाव परिसर कोअर झोनमध्ये ही घटना घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बामणगाव येथील कोअर क्षेत्रातील माळकुटी नवेगाव परिसरात फायर कटींगचे काम लॉकडाऊन पासुन सुरु झाले आहे. या परिसरातील अठ्ठावीस महिला फायर कटींगच्या कामाला जातात. गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान फायर लाईन कटींगचे काम करीत असताना एक महीला लघुशंकेसाठी गेली असता, गवत व झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर झडप घातली. यात महिलेचा मृत्यु झाला असून विद्या संजय वाघाडे (वय 34) असे महिलेचे नाव आहे.
हेही वाचा - दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कृषी कायद्यांची प्रत विधानसभेत फाडली