ETV Bharat / state

राजुरा तालुक्यात रानडुक्कराच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राजुरा तालुक्यात वाघांचा धुमाकूळ सूरू आहे. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत तालुक्यातील ९ जणांचा बळी गेला आहे. वाघाची दहशत असतानाच आता रानडुक्करांनीही बळीराजाची डोकेदुखी वाढवली आहे. रानडुक्करांकडून शेतपिकांचे नुकसान होत आहे.

राजुरा तालुक्यात रानडुक्कराच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी
राजुरा तालुक्यात रानडुक्कराच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी
author img

By

Published : Oct 7, 2020, 10:05 PM IST

चंद्रपूर - शेतात कामासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर रानडुक्करांनी हल्ला केला. यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना राजुरा तालुक्यातील चिंचोली येथे घडली. मारोती नेव्हारे आणि दादाजी घोडमारे (दोघेही रा. चिंचोली) असे जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राजुरा तालुक्यात वाघांचा धुमाकूळ सूरू आहे. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत तालुक्यातील ९ जणांचा बळी गेला आहे. वाघाची दहशत असतानाच आता रानडुक्करांनीही बळीराजाची डोकेदुखी वाढवली आहे. रानडुकरांकडून शेतपिकांचे नुकसान होत आहे. त्यात रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी होत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. दरम्यान, या हल्ल्यामुळे चिंचोली परिसरात दहशत पसरली आहे. रानडुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी बळीराजाने केली आहे.

हेही वाचा- 'त्या' नरभक्षक वाघाला दोन दिवसात ठार करा, अन्यथा... माजी आमदार निमकर यांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.