ETV Bharat / state

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा, आत्महत्येचा केला होता बनाव - कौटुंबिक वाद चंद्रपूर बातमी

भद्रावती शहरातील किल्ला वार्डात राहणाऱ्या एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, त्याच्या आत्महत्येचा बनाव करत त्याच्याच पत्नीने त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

पत्नीकडून पतीची हत्या
पत्नीकडून पतीची हत्या
author img

By

Published : May 24, 2020, 9:31 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्याच्या भद्रावती शहरातील किल्ला वॉर्डात राहणाऱ्या गणेश वाटेकर याने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस तपासात या व्यक्तीची हत्या त्याच्या पत्नीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात भद्रावती पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आली आहे.

गणेशचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याला एक वर्षाची मुलगी आहे. गणेश त्याच्या पत्नीपेक्षा कमी शिकलेला होता, सोबतच तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातूनच त्यांच्यात खटके उडायचे आणि त्यामुळे पत्नी अनेकदा माहेरी निघून जायची. काही दिवसांपूर्वीच गणेशच्या आई-वडिलांनी त्यांना वेगळे राहण्यास सांगितले. तो किल्ला वॉर्डातच भाड्याने राहत होता. दरम्यान २१ मे रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान गणेशने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पत्नीने शेजाऱ्यांना दिली. शेजारी घरी पोहचले तेव्हा गणेश पलंगावर मृतावस्थेत पडून होता. छताला एका दोर लटकलेला होता. माहिती मिळताच थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सुरू केला. दुसरीकडे मृतकाच्या भावाने घातपात झाल्याची तक्रार दिली. तर, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच तिने हत्या केल्याची कबुली दिली. पतीचे दोन्ही हात बांधले. त्याच्या नाकातोंडावर उशी ठेवून त्याचा श्वास रोखून मारल्याचे तिने कबूल केले. तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.