ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात दीड लाखातून फक्त 22 मराठा-कुणबीच्या नोंदी; 7 डिसेंबरपर्यंत चालणार नोंदीचं काम

Maratha Kunbi Records : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील कुणबी नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत. (Maratha reservation issue) चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा समितीने आतापर्यंत दीड लाख नोंदी तपासल्या. (order to check Kunbi records) यापैकी केवळ 22 जणांच्या नोंदी मराठा-कुणबी असल्याचे आढळून आले.

Maratha Kunbi Records
मराठा कुणबी नोंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 3:47 PM IST

चंद्रपूर Maratha Kunbi Records : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात आता हालचाली सुरू झाल्या असून राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील कुणबी नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण राज्यभरात मराठा-कुणबीच्या नोंदी तपासल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा समितीच्या नोंदी तपासल्या जात आहेत. आतापर्यंत दीड लाख नोंदी तपासल्या गेल्या असून यामध्ये केवळ 22 जणांच्या मराठा-कुणबी म्हणून नोंदी समोर आल्या आहेत. (Chandrapur District Committee)

24 ऑक्टोबरपासून मोहीम : मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीच्या नोंदी शोधण्यासाठी 24 ऑक्टोबरपासून मोहीमेच्या माध्यमातून नोंदी तपासल्या जात आहेत. यामध्ये आतापर्यंत 1 लाख 77 हजार 924 नोंदींची तपासणी करण्यात आली. दरम्यान मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठाच्या एकूण 22 नोंदी आढळून आल्या आहेत.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठाचे वर्गीकरण : एकूण 22 पैकी मराठा-कुणबी 17 तर कुणबी-मराठा 5 अशा नोंदी आढळून आल्या आहेत.

13 शासकीय विभागातून तपासणी : जिल्हा समितीकडून 13 शासकीय विभागातीळ जुन्या नोंदणी तपासल्या जात आहेत. यामध्ये महसूल, जन्म-मृत्यू, शैक्षणिक अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा कारागृह, मुद्रांक विभाग, भूमी अभिलेख, सैनिक कल्याण कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि अन्य दोन विभागांचा समावेश आहे.

ह्या कागदपत्रांतून तपासणी: महसूल अभिलेख खसरा पाहणी पत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर 1951, नमुना क्र. 1 व 2 हक्क नोंद पत्रक, सातबारा उतारे तपासले जात आहेत.

सर्वाधिक नोंदी कुणबी म्हणून : आतापर्यंत 1 लाख 77 हजार 924 नोंदी तपासल्या गेल्या असून यात सर्वाधिक नोंदी कुणबी समाजाच्या आहेत. यामध्ये 1 लाख 56 हजार 82 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या आहेत.

7 डिसेंबरपर्यंत चालणार तपासणी: 24 ऑक्टोबरपासून नोंदणी तपासणीचे काम सुरू झाले असून ह्या नोंदीची प्रक्रिया 7 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे संबंधित जातीचे कुणाकडे काही पुरावे असल्यास त्यापूर्वी ते सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा:

  1. काँग्रेसचा विजय म्हणजे 'इंडिया'चा विजय; पाच राज्यांच्या निकालात दिसेल २०२४ च्या विजयाची झलक - संजय राऊत
  2. मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, पुण्यात दुकानांच्या फलकांची केली तोडफोड
  3. विधानसभा निवडणूक 2023 ; पाच राज्यातील निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडं लोकांचा कल असल्याचं केलं स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.