ETV Bharat / state

चंद्रपूर : जलाशयांमधील पाणी पातळीत घट; पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी टिकवण्याचे प्रशासनासमोर आव्हान - चंद्रपूर जलाशय पाणी

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसात मोठी घट झाली. मागच्या वर्षी 1 हजार 261 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता, तर यावर्षी यात घट होऊन केवळ 870 मिलीमीटर इतकीच नोंद झाली आहे. एकूण पावसाच्या 83 टक्केच पाऊस यावर्षी जिल्ह्यात कोसळला. त्यामुळे, एरवी पाण्याने तुडुंब भरलेले प्रकल्प निम्म्यावर पोहोचले आहेत.

Chandrapur reservoirs water storage
जलाशयांमधील पाणी पातळीत घट
author img

By

Published : Nov 26, 2020, 7:47 PM IST

चंद्रपूर - मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसात मोठी घट झाली. मागच्या वर्षी 1 हजार 261 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता, तर यावर्षी यात घट होऊन केवळ 870 मिलीमीटर इतकीच नोंद झाली आहे. एकूण पावसाच्या 83 टक्केच पाऊस यावर्षी जिल्ह्यात कोसळला. त्यामुळे, एरवी पाण्याने तुडुंब भरलेले प्रकल्प निम्म्यावर पोहोचले आहेत. यापैकी घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगावसारख्या प्रकल्पांनी तळ गाठले आहे. उरलेला साठा अत्यल्प असल्याने रब्बी हंगामासाठी केवळ एक खेप पाणी देऊ शकणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

सदर चारही प्रकल्पांच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी पाटबंधारे विभागाने शेतीसाठी सिंचनाची सोय केली होती. मात्र, या प्रकल्पांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे, येत्या पावसाळ्यापर्यंत पाणी टिकवण्यासाठी जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

माहिती देताना चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शामसुंदर काळे

जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांची सध्याची स्थिती

जिल्ह्यात जलसाठ्याचा संचय करण्यासाठी 11 प्रकल्प आहेत. यामध्ये असोलमेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई, लालनाला (वर्धा) या प्रकल्पांचा समावेश आहे. असोलमेंढा येथे मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात 52.33 दशलक्ष घनमीटर जलसाठा होता. आता त्यात घट होऊन तो 47.37 दलघमी उरला आहे. याचप्रकारे घोडाझरी येथे पूर्वी 26.304 दलघमी तर आता 5.863 दलघमी, नलेश्वरमध्ये पूर्वी 5.1 दलघमी आता 1.8 दलघमी, चंदईमध्ये पूर्वी 6.8 दलघमी आता 1.2 दलघमी, चारगावमध्ये पूर्वी 26.35 दलघमी आता 13.29 दलघमी, लालनालामध्ये (वर्धा) पूर्वी 27.61 दलघमी आता 19.09 दलघमी इतका पाणीसाठा उरला आहे. ही एकूणच चिंतेची बाब आहे.

जिल्ह्यातील पावसाची सरासरी देखील घटली

चंद्रपूर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस येतो. त्यामुळेच येथे धानाची शेती मोठ्या प्रमाणात घेतली जाते. मात्र, निसर्गाच्या बदलाने हळूहळू या प्रमाणात घट होत आहे. आजवर चंद्रपूर जिल्ह्याची सरासरी पावसाची आकडेवारी ही 1 हजार 132 मिलिमीटर इतकी होती. मात्र, नव्या संशोधनानुसार याची अधिकृत शासकीय आकडेवारी ही 1 हजार 40 मिलिमीटर इतकी झाली आहे. त्यामुळे, भविष्यात पाण्याचे उत्तम नियोजन आणि सिंचनाच्या मुबलक सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागतील. अन्यथा येणारा काळ कठीण असणार आहे.

सिंचनासाठी दिलेले पाणी आणि त्याचे क्षेत्र

सिंचनासाठी मुख्यत्वे असोलमेंढा, घोडाझरी, नलेश्वर आणि चंदई प्रकल्पांचा उपयोग होतो. असोलमेंढा प्रकल्पातून 39.29 दलघमी, घोडाझरी 28.26 दलघमी, नलेश्वर 10.30 दलघमी, चंदई 4.41 दलघमी, तर चारगाव प्रकल्पातून 7.09 दलघमी इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या माध्यमातून 55 हजार 271 पैकी 50 हजार हेक्टर जमिनीला लाभ मिळाला.

जुलै, ऑगस्ट महिन्यात मारली पावसाने दडी

जून आणि जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस आला. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. याचा फटका जिल्ह्यातील प्रकल्प आणि त्यावर आधारित शेतकऱ्यांना बसला. जून महिन्यात जिल्ह्यात 172 मि.मी पाऊस पडला. जुलै महिन्यात 364 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली. इथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ दाखवली.

ऑगस्ट महिन्यात 227 मि.मी पाऊस पडला. याची टक्केवारी ही केवळ 57 टक्के आहे. तसेच, सप्टेंबर महिन्यात त्यात आणखी कमालीची घट झाली. या महिन्यात 85 मि.मी म्हणजे केवळ 40 टक्केच पाऊस पडला. त्यामुळे, हे वर्ष जिकरीचे ठरणार आहे. पाणी कमी पडल्याने भूजल पातळीत देखील घट झाली आहे. अशावेळी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाण्याची टंचाई भासण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा - 'अहमद पटेल यांच्या निधनाने एका अभ्यासू, बुद्धीमान अन् परखड नेतृत्वास देश मुकला'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.