ETV Bharat / state

वर्धा नदीचे राजूरा भागातील पाणी प्रदूषित; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल - Prof. Suresh Chowkat Environment Chandrapur

जिल्ह्यातील तीन मोठ्या नद्या प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे. वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्या प्रदूषित असल्याचे अहवालात म्हटले आहे.

वर्धा नदीचे राजूरा भागातील पाणी प्रदूषित
author img

By

Published : Nov 20, 2019, 10:04 PM IST

चंद्रपूर- जिल्ह्यातील तीन मोठ्या नद्या प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे. वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्या प्रदूषित असल्याचे अहवालात म्हटले आहे. राजूरा, गोंडपिपरी तालुक्यातील लाखो नागरिकांची तहान वर्धा, वैनगंगा नदीच्या पाण्याने भागविली जाते. पिण्यात येणारे पाणी प्रदूषित असल्याने भविष्यात नागरिकांना आरोग्याचा समस्यांना समोरे जावे लागणार आहे.

माहिती देताना प्रा. सूरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक,चंद्रपूर

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-२०१९ चा पाणी गुणवत्ता स्थिती अहवाल जाहीर केला आहे. वाटर क्वालिटी स्टॅटस या अहवालात महाराष्ट्रातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत. अहावालानुसार २०१७ च्या तुलनेत प्रदूषण कमी झाल्याचे म्हटले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील १७६ नद्या आणि इतर ठिकाणी समुद्र, धरणे कुपनलिका, विहिरी इत्यादी मिळून २८८ पाणी गुणवत्ता तपासणी केली आहे. केंद्राच्या आणि ६६ भूजल सर्वेक्षण केंद्राच्या माध्यमातून अभ्यास करून हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. प्रदूषणाच्या आधारावर मंडळाने महाराष्ट्रातील पाणी प्रदूषण निर्देशांक ठरविला आहे.

या सर्वेक्षणात पाण्याचे ४३ मापदंड तपासण्यात आले. परंतु निर्देशांक ठरविताना पीएच, डीओ, बीओडी आणि टी- इकोलाई हे मापदंड ठरविण्यात आले. या मापदंडानुसार महाराष्ट्रातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आढळली. सोबतच कमी प्रमाणात वर्धा, वैनगंगा, प्राणहीता या नद्या देखील प्रदूषित आढळल्या.

अहवालात चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, प्राणहीता या तिन मोठ्या नद्यांचे काही भागातील पात्र प्रदूषित असल्याचे म्हटले आहे. मात्र, २००८ ते २०१४ च्या तूलनेत दोन वर्षात या नद्यातील पाण्यांचे प्रदूषण कमी झाल्याचे म्हटले आहे. वर्धा नदीचे घुग्गूस ते राजूरा दरम्यानचे पाणी प्रदूषित असल्याचे ठरविण्यात आले आहे. तर, वैनगंगा नदीचे तुमसा ते आष्टी दरम्यानचे पाणी प्रदूषित असल्याचे अहवालात म्हटले आहे.

उपाययोजना शुन्य असताना प्रदूषण कमी कसे ?

महाराष्ट्रात चंद्रपूर, घुग्गूस ही शहरे वायू प्रदूषणात अव्वल ठरली आहेत. प्रदूषण कमी करण्याबाबत चंद्रपूर जिल्ह्यात उपाय योजनांचा अभाव आढळून येतो. वायू प्रदूषणाने उच्चांक गाठला असताना जिल्ह्यातील नद्याही प्रदूषित आहेत. जिल्ह्यात कारखान्यांची संख्या मोठी आहे. या कारखान्यातून निघणारे रासायनिक द्रव नदीत सोडले जाते, असा आरोप आहे. अश्यात २००८ ते २०१४ च्या तूलनेत पाणी प्रदूषण कमी झाल्याचे अहवालात म्हटल्याने तज्ज्ञांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

हेही वाचा- चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीत रानडुकरांचा धुमाकूळ

Intro:वर्धा नदीचे राजूरा भागातील पाणी प्रदूषित;महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

चंद्रपूर

चद्रपूर जिल्ह्यातील तिन मोठ्या नदीतील पाणी प्रदुषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवालातून पुढे आले आहे. वर्धा,वैनगंगा,प्राणहीता या नद्या प्रदूषित असल्याचे अहवालात म्हटले आहे. वर्धा नदीचे घुग्गुस ते राजूरा दरम्यानचे पाणी प्रदूषित आहे. तर वैनगंगा नदीचे तुमसा ते आष्टी दरम्यानचे पाणी प्रदूषित ठरविण्यात आले आहे. राजूरा,गोंडपिपरी तालूक्यातील लाखो नागरिकांची तहान वर्धा,वैनगंगा नदीचा पाण्याने भागविली जाते. पिण्यात येणारे पाणी प्रदूषित असल्याने भविष्यात नागरिकांना आरोग्याचा समस्यांना समोरे जावे लागणार आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2018-19 चा पाणी गुणवत्ता स्थिती अहवाल जाहीर केला. (water quality status) या अहवालात महाराष्ट्रातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित नद्या नागपूर जील्ह्यात आढळल्या आहेत. अहावाला नुसार 2017 च्या तुलनेत प्रदूषण कमी झाल्याचे म्हटले आहे.
प्रदूषण नीयंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील 176 नद्या आणि इतर ठिकाणी समुद्र,धरणे कुपनलिका,विहिरी इत्यादी मिळून 228 पाणी गुणवत्ता तपासणी केली. केंद्रांच्या आणि 66 भूजल सर्वेक्षण केंद्राच्या माध्यमातून अभ्यास करून हा अहवाल जाहीर केला आहे. ह्या प्रदूषणाच्या आधारावर मंडळाने महाराष्ट्रातील पाणी प्रदूषण निर्देशांक ठरविला आहे.
ह्या सर्वेक्षणात पाण्याचे 43 मापदंड तपासण्यात आले.परंतु निर्देशांक ठरविताना PH,DO,BOD,आणि T Ecoli form
हेच मापदंड ठरविण्यात आले.
ह्या मापदंडानुसार महाराष्ट्रातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आढळली. सोबतच कमी प्रमाणात वर्धा,वैनगंगा ,प्राणहिता प्रदूषित आढळल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा,वैनगंगा,प्राणहीता या तिन मोठ्या नद्यांचे काही भागातील पात्र प्रदूषित असल्याचे म्हटले आहे. मात्र 2008 ते 2014 तूलनेत दोन वर्षात या नद्यातील पाण्याचे प्रदूषण कमी झाल्याचे म्हटले आहे.वर्धा नदीचे घुग्गूस ते राजूरा दरम्यानचे पाणी प्रदूषित ठरविण्यात आले आहे तर वैनगंगा नदीचे तुमसा ते आष्टी दरम्यानचे पाणी प्रदूषित असल्याचे अहवालात म्हटले आहे.

उपाययोजना शुन्य...प्रदूषण कमी कसे ?

महाराष्ट्रात चंद्रपूर,घुग्गुस ही शहरे वायू प्रदूषणात अव्वल ठरली आहेत. प्रदूषण कमी करण्याबाबत उपाययोजनाचा अभाव चंद्रपूर जिल्ह्यात आढळून येतो. वायू प्रदूषणाने उच्चांक गाठलेला असतांना जिल्ह्यातील नद्याही प्रदूषित आहेत. जिल्ह्यात कारखान्यांची संख्या मोठी आहे. या कारखान्यातून निघणारे रासायनिक द्रव नदीत सोडले जाते,असा आरोप आहे. अश्यात 2008 ते 2014 च्या तूलनेत पाणी प्रदूषण कमी झाल्याचे अहवालात म्हटल्याने तज्ज्ञांचा भुवय्या उंचावल्या आहेत.Body:विडीओ बाईट
प्रा.सूरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक,चंद्रपूरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.