ETV Bharat / state

Chandrapur Flood News : चंद्रपुरात वर्धा नदीला महापूर; गावे पाण्यात, हजारोंचे विस्थापन - Wardha river flood in Chandrapur

वर्धा, वैनगंगा, उमा, इरई नदीला आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना बसला ( Wardha river flood in Chandrapur ) आहे. अनेक गावांना पुराने वेढा दिला. दोन हजारचा आसपास नागरिकांना सूरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या पुराचा फटका पाळीव जनावरांनाही बसला आहे. इरई, अप्पर वर्धा, बगोसे खुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सूरूच आहे. वर्धा, वैनगंगा, इरई नदी धोधो वाहत आहेत. नदीचा पुराने अनेक गावाला वेढा दिला. माजरी, बेलसनी गावात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे.

Chandrapur Flood News
चंद्रपुरात वर्धा नदीला महापूर
author img

By

Published : Jul 20, 2022, 4:56 PM IST

चंद्रपूर - विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. अनेक नद्यानाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वर्धा नदीला महापूर आला ( Wardha river flood in Chandrapur ) आहे. चंद्रपूर जिल्हा आता पुराच्या विळख्यात सापडला ( Chandrapur Flood ) आहे. जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग बंद झाले आहेत. यवतमाळ - चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

चंद्रपुरात वर्धा नदीला महापूर, प्रतिनिधीने नदीच्या पुलावरुन घेतलेला आढावा

सर्वदूर मुसळधार, अनेक नद्यांना पूर - वर्धा, वैनगंगा, उमा, इरई नदीला आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना बसला आहे. अनेक गावांना पुराने वेढा दिला. दोन हजारचा आसपास नागरिकांना सूरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या पुराचा फटका पाळीव जनावरांनाही बसला आहे. इरई, अप्पर वर्धा, बगोसे खुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सूरूच आहे. वर्धा, वैनगंगा, इरई नदी धोधो वाहत आहेत. नदीचा पुराने अनेक गावाला वेढा दिला. माजरी, बेलसनी गावात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. दोन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी प्रशासनाने हलविले. अद्यापही कार्य सूरूच आहे.

अनेक गावे पाण्याखाली - संततधार पावसामुळे आधीच नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने शिरणा, मूल तालुक्यातील ताडाव कोराडी आणि वर्धा नदीला पूर आला. त्यामुळे माजरीसह परिसरातील गावांना पुराचा विळखा बसला आहे. आतापर्यंत पुरात अडकलेल्या, शेतातील बांद्यावर अडकून असलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर-वणी मार्ग बंद झाला आहे. बामणी येथील वर्धा नदीचा पुलावरून पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजुरा- हैदराबाद मार्ग बंद आहे.तर महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पुल पाण्याखाली आला आहे. पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - 'ब्रा काढून ठेवल्याने आम्हाला आमची छाती केसांनी झाकावी लागली..', नीट परीक्षेत अंतर्वस्र काढून बसवलेल्या मुलीने सांगितला धक्कादायक अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.