ETV Bharat / state

Vijay Wadettiwar On OBC Meeting: ओबीसी नेत्यांची 29 सप्टेंबर रोजीची बैठक बनावट- विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार - Maratha reservation

Vijay Wadettiwar On OBC Meeting : चंद्रपुरमध्ये ओबीसी महासंघाचे विद्यार्थी जिल्हाप्रमुख रवींद्र टोंगे यांचं उपोषण सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं बैठक बोलावलीय. परंतु या बैठकीवर राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ते नक्की काय म्हणालेत, ते सविस्तर जाणून घेऊ या.

Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 9:50 PM IST

चंद्रपूर- Vijay Wadettiwar On OBC Meeting : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देण्यात येऊ नये, ही प्रमुख मागणी घेऊन चंद्रपुरात ओबीसी समाज एकवटला आहे. खरं तर अशावेळी तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविणे गरजेचं होतं. मात्र, 29 सप्टेंबरला ओबीसी नेत्यांची बैठक सरकारनं बोलाविली आहे. ज्या लोकांचे ओबीसी चळवळीत काहीही योगदान नाही, अशा बनावट ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आलीय. यातून या सरकारची मानसिकता दिसून येतेय. त्यांना ओबीसींविषयी कुठलाही कळवळा नाही, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपुरात केला. चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ओबीसी आंदोलनस्थळी भेट दिली.

अन्नत्याग आंदोलन : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, ही प्रमुख मागणी घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विद्यार्थी जिल्हाप्रमुख रवींद्र टोंगे हे मागील 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. तब्बल 16 दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. आता त्यांची प्रकृती गंभीर आहे. यादरम्यान ओबीसी समाजाने अनेक आंदोलने केली. मात्र, शासनानं त्याची अद्याप गंभीर दखल घेतलेली नाही. त्यातही आता 29 तारखेला सरकारने ओबीसी नेत्यांची बैठक बोलाविली आहे. मात्र, ज्यांचे चळवळीत काहीही योगदान नाही, अशांना यात निमंत्रित केलंय. त्यामुळे सरकार किती संवेदनशील आहे हे दिसून येतंय, असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.

विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या हातात सत्ता द्या. मी एका महिन्यात ओबीसीचा प्रश्न सोडवतो, असा दावा केला होता. मात्र सत्तेवर आल्यानंतर अनेक महिने लोटूनही अद्याप ओबीसींचा प्रश्न सुटलेला नाही. फडणवीस यांनीदेखील अद्याप संन्यास घेतला नाही- विजय वडेट्टीवार

डाटा एन्ट्री ऑपरेटरचे शोषण : या सरकारला सामान्य माणसांच्या भावनेशी काहीही देणंघेणं नाही. राज्यात 27 हजार ग्रामपंचायतीवर कंत्राटी पद्धतीनं 27 हजार डाटा एन्ट्री ऑपरेटर ठेवण्यात आले आहेत. त्यांना केवळ 6 हजार 900 मानधन आहे. तर हीच कंपनी ग्रामपंचायतीकडून 12 हजार रुपये महिना घेते. त्यानुसार 140 कोटी दर महिन्याला या कंपनीला दिलं जातं. या पैशांचे वाटेकरी कोण? या कंपनीचा कुणाशी संबंध आहे, हे तपासणेदेखील आवश्यक आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

जातीजातीमध्ये तेढ : मराठा समाज ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी अडला आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाज याचा विरोध म्हणून आंदोलन करत आहे. धनगर समाज एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे, तर आदिवासी समाज आता याचा विरोध करत आहे. राज्यात केवळ एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभे करण्याचं काम हे सरकार करत आहे, असा आरोप देखील वडेट्टीवारांनी यावेळी केलाय.

हेही वाचा :

  1. Vijay Wadettiwar : कंत्राटी पद्धतीनं भरती; विजय वडेट्टीवार आक्रमक, म्हणाले...
  2. Vijay Wadettiwar On Teacher Recruitment: आता शिक्षकही कंत्राटी, सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव- विजय वडेट्टीवार यांचा आरोप
  3. Vijay Vadettiwar On Maratha Reservation : मराठा, कुणबी वाद लावण्यात भाजपाला यश - वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.