चंद्रपूर - जांभुळघाट मार्गावरून जीत असताना अनिल हरीशचंद्र कामडी (वय ४५) यांना अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच चिमुर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूरला पाठवण्यात आले.
चिमूर तालुक्यामधील नेरी येथील गांधी वार्ड येथे राहणारा अनिल कामडी मालेवाडा येथे मित्रांच्या पार्टीकरता चिकन व मसाला घेऊन (एम. एच. ३४ एस. ७०१४) क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. नेरीवरून तीन किलोमीटर अंतरावरील रामपूर पुढील वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामूळे दुचाकीवरून उसळुन रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहीती चिमूर पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र खैरकर पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. शवविच्छेदनाकरता मृतदेह उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. मृत अनिलच्या मागे आई ,वडील , पत्नी व दोन मुल असा आप्त परीवार आहे . पुढील तपास चिमूर पोलीस करत आहेत.