चंद्रपूर - ऐन दिवाळीच्या पर्वात चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, कोरपणा तालूक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सूभाष लक्ष्मण ठाकरे ( वय ४० ), मारोती फकरु सिडाम ( वय ४० ) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
राजूरा तालूक्यातील मौजा खैरगुडा येथिल सुभाष लक्ष्मण ठाकरे यांना पाच एकर शेती आहे. सततचा पावसामुळे पिक गेले. त्यात बँकेचे एक लाखाचे कर्ज आणि ५५ हजाराचे वाहन कर्ज त्यांचावर होते. पिक हातात आल्यावर कर्जफेड करणार होते. मात्र, पिक गेल्याने ते खचले. कुटूंबियांना लक्षात येताच त्यांनी राजूरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कोरपणा तालूक्यातील सोनुर्ली ( वनसडी ) येथिल शेतकरी मारोती फकरु सिडाम यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांना पाच एकर कोरडवाहू शेती आहे. शेतात कपाशीचे पिक उभे आहे. परतीचा पावसाचा फटका कपाशीला बसला. कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्यावर बँकेचे एक लाख तर वैयक्तिक दोन लाखाचे कर्ज होते. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते.अखेर विष प्राशन करुन जीवन संपवले. ऐन दिवाळीचा पर्वावर जिल्ह्यातील दोन शेतकरी आत्महत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजूरा तालूक्यातील मौजा खैरगुडा येथिल सुभाष लक्ष्मण ठाकरे यांना पाच एकर शेती आहे. सततचा पावसामुळे पिक गेले. त्यात बँकेचे एक लाखाचे कर्ज आणि ५५ हजाराचे वाहन कर्ज त्यांचावर होते. पिक हातात आल्यावर कर्जफेड करणार होते. मात्र, पिक गेल्याने ते खचले. त्यांनी घरीच विष प्राशन केले. कुटूंबियांना लक्षात येताच त्यांनी राजूरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कोरपणा तालूक्यातील सोनुर्ली ( वनसडी ) येथिल शेतकरी मारोती फकरु सिडाम यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांना पाच एकर कोरडवाहू शेती आहे. शेतात कपाशीचे पिक उभे आहे. परतीचा पावसाचा फटका कपाशीला बसला. कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्यावर बँकेचे एक लाख तर वैयक्तिक दोन लाखाचे कर्ज होते. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते.