चिमूर (चंदपूर)- चिमूर तालुक्यात सांयकाळच्या दरम्यान सोसाटाच्या वाऱ्याने तालुक्यातील कवडशी (देश) येथील बाळाजी वंजारी यांच्या शेतातील विजेचा खांब तारासह कोलमडला. त्यामुळे जवळच असलेल्या बैलजोडीला वीजवाहक तारांचा स्पर्श होऊन दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर
पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत अत्यावश्यक असल्याने शेतकरी शेतीकामात गुंग आहे. कवडशी (देश) येथील शेतकरी बाळाजी वंजारी हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात बैलजोडीने वखरणी करण्यासाठी गेले होते. सांयकाळी सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासोबतच हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. यात शेतात असलेल्या वीजेचा खांब तारासह कलडंल्याने बाजुलाच असलेल्या बैलांना वीजेच्या तारांचा स्पर्श झाला. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला.
पावसाळी हंगाम तोंडावर आले असताना शेतीची मशागत व शेती उपयोगी साहीत्य वाहतुकीसाठी उपयोगाच्या जिवाभावाच्या बैलजोडीचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर आभाळ कोसळले आहे. शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून आता मशासगत कशी करायची हा प्रश्न त्याच्यासमोर आहे. बैलांच्या मृत्यूने झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकारकडून त्वरीत आर्थिक मदत मिळावी अशी विनंती शेतकऱ्यासह गावकऱ्यांनी केली आहे.