ETV Bharat / state

सांबराचे मांस खरेदी खवैयांना पडले महागात; दोघे अटकेत - चंद्रपूर पोलीस

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या काळात सर्वत्र संचारबंदी असल्याचा फायदा तालुक्यातील वन्य प्राणी शिकारी घेत आहेत. शिकार केलेले मांस लपून छपून खास खवैय्यांना विक्री करून शिकारी पैसा कमावित आहेत.

two arrested in chandrapur for allegedly buying meat amid lockdown

author img

By

Published : Apr 24, 2020, 4:07 PM IST

चंद्रपूर - नेरी वन क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बोडधा नेरी मार्गावर वन्यप्राण्यांची शिकार करून विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून वनक्षेत्राधिकारी पी. एम. डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शिवनपायली मोडीवर दबा धरून बसले होते. शिवनपायली येथील खवय्ये सांबराचे मांस खरेदी करून दुचाकीवरुन येत असताना दुचाकीसह त्यांना अटक करण्यात आली, तर मुख्य सुत्रधार मांस विक्री करणारा अद्याप फरार असून वन व पोलीस विभागाकडून त्याचा शोध सुरू आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या काळात सर्वत्र संचारबंदी असल्याचा फायदा तालुक्यातील वन्य प्राणी शिकारी घेत आहेत. शिकार केलेले मांस लपून छपून खास खवैय्यांना विक्री करून शिकारी पैसा कमावित आहेत. यावर प्रतिबंध घालण्याकरिता वन विभागातर्फे पेट्रोलिंग केले जात आहे व अंतर्गत स्त्रोत मजबूत करण्यात येत आहेत. अशाच गोपनीय सुत्रांकडून बोडधा शेतशिवारात सांबराची विक्री केली जात असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली. त्याआधारे नेरी वनक्षेत्राधिकारी पी.एम.डांगे यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे पथक बोडधा ते नेरी रस्त्यावरील,मौजा शिवणपायली मोड रस्त्यावर सकाळच्यादरम्यान दबा धरून बसले होते.

शिवनपायली येथील महेश नाकाडे व मुरलीधर वाघाडे हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच ३४ ए बी ४७१४ने बोडधावरून सांबराचे मांस खरेदी करून शिवणपायलीला येत होते. संबंधित दुचाकी जवळ येताच त्यांना थांबविण्यात आले. चौकशी केली असता त्यांनी सांबराचे मांस खरेदी करून आणल्याचे सांगितले. यावरून दोन्ही मांस विकत घेणाऱ्या आरोपींना दुचाकीसह वनक्षेत्राधिकारी पी.एम.खोब्रागडे व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपींवर वनजीव अधिनियम (संरक्षण) १९७२ अन्वये भांदवी कलम ९,४४,४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आरोपींची कसून चौकशी केली असता सांबराचे मांस विक्री करणारा मुख्य आरोपी हा चिमूर तालुक्यातील बोडधा येथील असल्याचे त्यांनी सांगितले. फरार आरोपीचे नाव समजू शकले नाही. वनविभागाबरोबर चिमूर व भीसी पोलीस मुख्य आरोपीचा कसून शोध घेत आहेत. वनविभागाच्या कारवाई पथकात नेरी येथील वनक्षेत्राधिकारी पी.एम. खोब्रागडे, वनरक्षक कैलास डी. मसराम, एस. एन. नागरे, टी. ए. सोनुले यांचा समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.