ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 20 रुग्ण कोरोनामुक्त; ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ 3 - चंद्रपूर कोरोना अपडेट

आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 73 हजार 679 नागरिक दाखल झाले आहेत. तसेच, 65 हजार 672 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहेत. तर 8 हजार 7 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

Chandrapur covid 19
चंद्रपूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 3, 2020, 7:04 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील 7 रुग्ण मंगळवारी कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकूण 20 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 आहे. या तिनही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 13 नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 23 नमुने, निगेटिव्ह 906 नमुने तर 84 नमुने प्रतीक्षेत आहेत.

ग्रामस्तरावर 3 हजार 110 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर 306 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावर 322 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेत, असे एकूण जिल्ह्यातील 3 हजार 738 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.