ETV Bharat / state

नियंत्रण सुटल्याने ट्रकची चार दुचाकींना धडक; जीवितहानी टळली

नियंत्रण सुटलेल्या ट्रकने राजुरा रेल्वे उड्डाण पूलाजवळ उभ्या असणाऱ्या चार दुचाकींना धडक दिली. यात चारही वाहने चक्कनाचूर झाली असून जीवितहानी टळली आहे. मात्र या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

author img

By

Published : Jun 15, 2020, 6:02 PM IST

chandrapur accidents
नियंत्रण सुटलेल्या ट्रकने राजुरा रेल्वे उड्डाण पूलाजवळ उभ्या असणाऱ्या चार दुचाकींना धडक दिली.

चंद्रपूर - नियंत्रण सुटलेल्या ट्रकने राजुरा रेल्वे उड्डाण पूलाजवळ उभ्या असणाऱ्या चार दुचाकींना धडक दिली. यात चारही वाहने चक्कनाचूर झाली असून जीवितहानी टळली आहे. मात्र, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

आज (सोमवार) दुपारचा सुमारास अचानक पाऊस आल्याने राजूरा-बल्हारपूर मार्गावर काही दुचाकीस्वार रेल्वे उड्डाण पुलाजवळ उभे होते. पावसापासून बचाव करण्यासाठी जवळील झोपडीत त्यांनी आसरा घेतला होता.
राजुरावरून छत्तीसगडच्या दिशेने जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले; आणि पुलाजवळील दुचाकींना धडक दिली. यानंतर चालकाने रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा केला. मात्र धडकेत चार दुचाकी चकनाचूर झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच राजुरा वाहतूक शाखेतील प्रशांत शेंडे, उमेश रामटेके, प्रकाश जुनघरे यांनी घटनास्थळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.