चंद्रपूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1358 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात 895 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, कोरोनामुळे मंगळवारी 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 73 हजार 314 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुक्तांची एकूण संख्या 59 हजार 976 एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 12 हजार 212 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना निदानासाठी एकूण 4 लाख 18 हजार 95 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये चिमूर तालुक्यातील किटाळी मक्ता येथील 44 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील 57 वर्षीय महिला, सिंदेवाही तालुक्यातील 81 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील आसेगाव येथील 46 वर्षीय पुरुष, बाळापूर तळोधी येथील 51 वर्षीय पुरुष व पाथरी येथील 35 वर्षीय महिला, तर वणी-यवतमाळ येथील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1126 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1039, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 35, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.
कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
दरम्यान नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन कारावे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा नियमित उपयोग करावा. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.