ETV Bharat / state

वाघिणीच्या हल्ल्यात तेंदुपत्ता महिला मजूर ठार, चिमूर तालुक्यातील घटना - tigress attack news chandrapur

चिमूर तालुक्यातील कोलारा येथे मंगळवारी सकाळी गावातील इतर मजुरांसोबत तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिला मजुरावर वाघिणीने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.

वाघाच्या हल्यात तेंदुपत्ता महिला मजुर ठार

author img

By

Published : May 19, 2020, 1:12 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील कोलारा (तु) येथील लीलाबाई चंद्रभान जिवतोडे (वय ५०) हि महिला पतीसह तेंदुपत्ता संकलन करायला गेली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअरझोन मधील कंपार्टमेंट १४१ मध्ये तेंदुपत्ता संकलन करत असताना वाघिणीने हल्ला करून लिलाबाईला ठार केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान घडली आहे.

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

गेल्या काही महिन्यांपासून तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वल, वाघाचे हल्ले झाल्याच्या घटनांनी दहशत पसरली आहे. यातच तालुक्यातील बहुतेक तेंदुपत्ता संकलन केंद्र लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करून सुरू आहे. पळसगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोलारा (तु) येथील तेंदुपत्ता मजूर नजीकच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये तेंदुपत्ता संकलन करण्याकरता जातात.

नेहमीप्रमाणे गावातील इतर मजुरांसह लिलाबाई जिवतोडे ही देखील मंगळवारी पहाटे तेंदुपत्ता संकलनासाठी गेली होती. दरम्यान, सकाळी ७.३० च्या सुमारास या परिसरात फिरणाऱ्या वाघिणीने तेंदुपत्ता तोडण्यात मग्न असलेल्या लिलाबाईवर हल्ला केला. लिलाबाईच्या झटापटीने व आवाजाने पती चंद्रभानला वाघिणीने हल्ला केल्याचे दिसले. चंद्रभानने आरडाओरडा करत वाघिणीला पळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गावातील तेंदुपत्ता मजूर धावून आले आणि वाघिणीला पळवून लावले. मात्र, लिलाबाईला वाचवू शकले नाही.

एक महिन्यापुर्वीही याच परिसरात सातारा येथील मोहफुल वेचणाऱ्या यमुना गायकवाड या महिलेस वाघिणीने ठार मारले होते. वाघिणीच्या संचाराने या परिसरात सर्वत्र दहशत पसरली आहे. त्यामुळे तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर लॉकडाऊन काळात जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.