ETV Bharat / state

...तर ताडोबातील वाघांची नसबंदी होणार, आज बैठकीत चर्चा! - tigers in tadoba wild sanctuary

देशाची लोकसंख्या वाढायला लागली. त्यावेळी कुटुंब नियोजनाची संकल्पना राबवण्यात आली. आता हीच संकल्पना वाघांच्या संदर्भात राबवण्याचा विचार होतोय. जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांची नसबंदी करण्याचा विचार वनविभाग करत आहे. हा विचार अजब वाटत असला तरी, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे.

tigers in maharashtra
तर ताडोबातील वाघांची नसबंदी होणार...आज बैठकीत चर्चा!
author img

By

Published : Aug 7, 2020, 12:39 PM IST

चंद्रपूर - देशाची लोकसंख्या वाढायला लागली. त्यावेळी कुटुंब नियोजनाची संकल्पना राबवण्यात आली. आता हीच संकल्पना वाघांच्या संदर्भात राबवण्याचा विचार होतोय. जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांची नसबंदी करण्याचा विचार वनविभाग करत आहे. हा विचार अजब वाटत असला तरी, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचं नाव येताच डोळ्यासमोर येतात ते पट्टेदार वाघ. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि संपन्न असं घनदाट जंगल. सध्या या जंगलात 300 वर वाघ मुक्तपणे वावरत आहेत. आता वाघांना जंगल अपुरे पडू लागल्याने मानव-वन्यजीव संघर्ष सुरू झाला. या वर्षात आतापर्यंत 11 जणांचे बळी वाघांनी घेतले आहेत. वाघांची संख्या वाढू लागल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होत आहे. यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज (7 ऑगस्ट) रोजी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाची बैठक होत आहे. त्यात विविध उपायांवर चर्चा होणार आहे. त्यातील एक उपाय वाघांच्या नसबंदीचाही आहे.

नसबंदी केल्यास प्रजनन थांबेल आणि संघर्ष कमी करण्यास मदत होईल, असा तर्क लावला जात आहे. या जिल्ह्यात वाघांचा मृत्यूदर फारच नगण्य आहे. वाघांच्या प्रजननासाठी जिल्ह्यातील वातावरण अतिशय पोषक आहे. त्यामुळे वाघांची संख्या सतत वाढत आहे. हे आशादायी चित्र असताना नसबंदी करून त्यावर कृत्रिम आळा घालण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पूर्वी जिल्ह्यातून पन्नासवर वाघांच्या स्थानांतर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा विषय बैठकीत मांडला जात आहे. मात्र, नसबंदीचा विषय बैठकीच्या अजेंड्यावर आणताना त्याचा कोणताही अभ्यास केला गेलेला नाही, असा आरोप वन्यजीवप्रेमी करत आहेत.

एकीकडे देशात वाघांच्या संख्येवर आणि त्यांच्या अस्तित्वावर चिंता व्यक्त होत असताना आता त्यांचं प्रजननच थांबवणं, हे कितपत संयुक्तीक आहे, याचा विचार आता वनविभागानं करण्याची गरज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.