ETV Bharat / state

पावसात दयाल राईस मिलची भिंत कोसळली...एकाचा मृत्यू, 3 जखमी - chimur news

सांयकाळच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह पाऊस आला. आडोसा घेण्यासाठी सगीर शेख राईस मिलच्या संरक्षक भिंतला खेटून उभा होता. दरम्यान, अचानक मिलची संरक्षण भिंत कोसळली. ही भिंत येथील दुकाने तसेच सगीर शेख यांच्यावर कोसळली.

the-wall-of-dayal-rice-mill-collapsed-in-the-rain-in-chandrapur

author img

By

Published : May 7, 2020, 4:17 PM IST

चिमूर (चंद्रपूर)- अचानक वातावरणात बदल होऊन बुधवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. या पावसात दयाल राईल मिलची संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील भिसी येथे बुधवारी सांयकाळच्या सुमारास ही घटना घडली. सगीर हैदर शेख (वय 45) असे मृत्यू व्यक्तीचे नाव आहे.

पावसात दयाल राईस मिलची भिंत कोसळली...

हेही वाचा- लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...

भीसी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या चौकात दयाल राईस मिल आहे. परिसरातील नागरिकांना मीलमधील कोंड्याचा त्रास होऊ नये म्हणून ३० फुट संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. भिंतीच्या बाजुला विजय तुकाराम मेश्राम यांचे हार्डवेअर तर, प्रकाश मेश्राम व दिनेश देशकर यांचे किराणा दुकाने आहेत.

बुधवारी सांयकाळच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह पाऊस आला. आडोसा घेण्यासाठी सगीर शेख राईस मिलच्या संरक्षक भिंतला खेटून उभा होता. दरम्यान, अचानक मिलची संरक्षण भिंत कोसळली. ही भिंत येथील दुकाने तसेच सगीर शेख यांच्यावर कोसळली. यात चौघे भिंतीखाली अडकले. परिसरातील नागरिकांना भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या चौघांना बाहेर काढले. यात गंभीर जखमी असलेले सगीर हैदर शेख व प्रकाश पंचम मेश्राम याना तातडीने उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर सगीर शेख डाॅक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

तर किराणा दुकानदार प्रकाश पंचम मेश्राम (वय 45) यांना पुढील उपचारासाठी नागपुरला पाठविण्यात आले आहे. किराणा दुकानदार दिनेश देशकर (वय 42), अर्चना दिनेश देशकर (वय 38 वर्ष), यांना या घटनेत किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना भीसी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे.

राईस मीलच्या संरक्षक भिंतीच्या बाजुला असलेली चारही दुकाने जमीनदोस्त झाली आहेत. यात दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. तर परिसरात उभ्या असलेल्या काही दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

दरम्यान, याच वादळी पावसात आदर्श जनता विदयालय व महात्मा गांधी विद्यालया तसेच प्रकाश मेक्षाम यांच्या घराचे छ्तही उडाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.