चंद्रपूर - ब्रम्हपुरी तालुक्यात तब्बल तीन जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. या वाघाने मागील काही दिवसांत दहशत माजवली होती. त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.
मुख्य संरक्षक यंच्याशी चर्चा केली ब्रम्हपुरी तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. येथे टी-103 या अडीच वर्षीय वाघाने धुमाकूळ घातला होता. 28 जून, 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्टला या वाघाने तीन जणांचा जीव घेतला. 17 ऑगस्टला शेतात काम करीत असताना दहा लोकांच्या समोर या वाघाने विलास रंधये या शेतमजूराला ठार करीत फरफटत नेले. त्यामुळे या वाघाची दहशत निर्माण झाली. या वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली. जनतेचा तीव्र रोष लक्षात घेता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्याचे प्रधान मुख्य संरक्षक यंच्याशी चर्चा केली. त्यानुसार या वाघाला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या वाघाला बेशुद्ध करून बंदिस्त करण्यासाठी वनविभागाची चमू सक्रिय झाली.
परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास ब्रम्हपुरी उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भगवानपूर परिसरात हा वाघ मुक्तसंचार करीत असल्याची माहिती चमूला मिळाली. सकाळी सात वाजताच्या दरम्यान या वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. तर थोड्याच वेळात त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले गेले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे, सशक्त पोलीस अजय मराठे यांच्या चमूने ही कामगिरी पार पाडली. यानंतर वाघाला चंद्रपूर येथील transit treatment centre येथे दाखल करण्यात येणार आहे.
हेही वाचा - Shinde Fadnavis government शिंदे फडणवीस सरकारच्या 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर