चंद्रपूर: जिवती तालुका हा अत्यंत दुर्गम समजला जातो. येथील ताडी हिरापूर येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा (Zilla Parishad Primary School) आहे. या शाळेतील 49 वर्षीय शिक्षक अच्युत खोबाजी राठोड याने काही अल्पवयीन मुलींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून विकृतपणाचा कळस गाठला.अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत त्यांच्यावर अत्याचार केले. संतापजनक म्हणजे गेल्या वर्षभरापासून त्या शिक्षकाने तब्बल 7 मुलींवर अत्याचार ( teacher abused seven girls through out the year) केल्याचे समोर आले आहे.
काही पीडित मुलींनी ही बाब आपल्या आईना सांगितली. त्या मुलींच्या आईने त्या शिक्षकाविरुद्ध जिवती पोलीस ठाण्यात तत्काळ तक्रार दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांनी तात्काळ कारवाई केली. या प्रकरणी बाललैंगिक अपराध, पास्को यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्या नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा: Husband forced for rape : पतीने शेतमालकाला पत्नीवर करायला लावला सामुहिक बलात्कार