ETV Bharat / state

आमदार चषक स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 20 जण जखमी - The spectator gallery collapsed

आमदार चषक स्पर्धेत प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. ( MLA Cup competition) यातील काहींची स्थिती गंभीर आहे. ही घटना काल संध्याकाळी वरोरा येथे घडली. स्थानिक आमदार प्रतिभा धानोरकर ह्यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार चषक स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 20 जण जखमी

author img

By

Published : Dec 5, 2021, 10:50 AM IST

चंद्रपूर - आमदार चषक स्पर्धेत प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. यातील काहींची स्थिती गंभीर आहे. ( MLA Cup competition in Chandrapur ) ही घटना काल संध्याकाळी वरोरा येथे घडली. स्थानिक आमदार प्रतिभा धानोरकर ह्यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार चषक स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 20 जण जखमी
वरोरा येथे दरवर्षी कब्बडी सामन्याचे आयोजन केले जाते. ( MLA Cup competition) शनिवारपासून या स्पर्धेला सुरवात झाली आहे. काल सामन्याचा पहिलाच दिवस असल्याने सामना बघायला प्रेषकांनी अलोट गर्दी केली होती. प्रेक्षकांची गर्दी जास्त झाल्यामुळं गॅलरीवर भर अधिक झाला. त्यामुळे बघता बघता संपूर्ण गॅलरीच खाली कोसळली. यामध्ये 15 ते 20 जण जखमी झाले असून, यात मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा - Ghulam Nabi Azad slams Centre : केंद्र सरकार काश्मीरच्या लोकांच्या कल्याणासाठी झटत नाही; गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.