ETV Bharat / state

जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ; 1 हजार 11 बाधितांवर उपचार सुरू - चंद्रपूर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढ न्यूज

अथक प्रयत्नानंतर राज्यात कोरोना आटोक्यात आणण्यात शासन आणि प्रशासनाला यश आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Chandrapur Corona Update
चंद्रपूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 19, 2021, 7:40 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 136 कोरोनाबाधीत रूग्णांची नोंद झाली तर, एका बाधिताचा मृत्यू झाला. 97 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत एकूण 25 हजार 264 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 23 हजार 846 रूग्ण बरे झाले आहेत. सध्या 1 हजार 11 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 40 हजार 610 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 12 हजार 252 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

विविध ठिकाणी आढळत आहेत रूग्ण -

गुरुवारी मृत अरविंद नगर येथील 67 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 407 बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 368, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. गुरुवारी आढळलेल्या 136 बाधित रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 53, चंद्रपूर तालुका 12, बल्लारपूर 8, भद्रावती 14, ब्रम्हपुरी 11, नागभिड 8, सिंदेवाही 3, मूल 3, सावली 2, राजुरा 1, चिमूर 7, वरोरा 4, कोरपना 1 व इतर ठिकाणच्या 9 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी -

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यात आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित करावा. आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - उपराजधानीत कोरोनाचा कहर; नागपुरात 3 हजार 796, तर पूर्व विदर्भात 4 हजार 501 बाधित रूग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.