ETV Bharat / state

राजुरा येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; चोरट्याने सीसीटीव्ही फोडला

आज (सोमवार) दुपारी गडचांदूर मार्गावरील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या चाळीत असलेल्या टाटा इंडिकॉमचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले.

राजुरा येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
author img

By

Published : May 6, 2019, 7:09 PM IST

चंद्रपूर - राजुरा शहरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज (सोमवार) दुपारी गडचांदूर मार्गावरील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या चाळीत असलेल्या टाटा इंडिकॉमचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले.

गडचांदूर मार्गावरील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या चाळीत टाटा इंडिकॉम कंपनीचे एटीएम आहे. येथे फार कमी ग्राहक पैसे काढण्यासाठी येत असतात. आज एक ग्राहक पैसे काढण्यासाठी गेला असता त्याच्या नोटा पूर्ण निघाल्या नाहीत. त्याने अर्धवट आलेल्या नोटा जोरात ओढल्या असता मशीनचे कव्हर उघडले गेले. यात हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, त्याने कुणालाही याबाबत सांगितले नाही.

थोड्या वेळाने चाळमालक आशिष यमनुरवार पैसे काढण्याकरिता गेले असता त्यांना एटीएम फोडल्याचे लक्षात आले. तसेच मशिनच्यावर असलेला सीसीटीव्ही कॅमेरासुद्धा फोडण्यात आला होता. ही घटना लक्षात येताच त्यांनी एटीएममध्ये पैसे भरणारी कंपनी सीएमएसच्या कर्मचाऱयांना कळवले असून त्यांच्या मते चोरीचा प्रयत्न असफल झाल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांना कळवण्यात आले असून पूढील तपास सुरू आहे.

Intro:चंद्रपुर : राजुरा शहरात एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज दुपारी गडचांदूर मार्गावरील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या चाळीत असलेल्या टाटा इंडिकॉम च्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले.Body:गडचांदूर मार्गावरील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या चाळीत टाटा इंडिकॉम कंपनीचे एटीएम आहे. येथे फार कमी ग्राहक येतात. आज एक ग्राहक पैसे काढण्यासाठी गेला असता त्याच्या नोटा पूर्ण निघाल्या नाही. त्याने अर्धवट आलेल्या नोटा जोरात ओढल्या असता मशीनचे कव्हर उघडले गेले. यात हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, त्याने कुणालाही ह्याबाबत सांगितले नाही. थोड्या वेळाने चाळमालक आशिष यमनुरवार पैसे काढण्याकरिता गेले असता त्यांना एटीएम फोडल्याचे लक्षात आले. तसेच मशिनच्या वर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा फोडण्यात आला होता. ही घटना लक्षात येताच त्यांनी एटीएममधे पैसे भरणारी कंपनी CMS च्या कर्मचार्यांना कळविले असून त्यांच्या मते चोरीचा प्रयत्न असफल झाल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असून पूढील तपास सुरू आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.