ETV Bharat / state

धक्कादायक : डिझेल टॅंकर आणि ट्रकची भीषण धडक; अपघातात 9 जण जागीच जळून खाक - चंद्रपूर अपघात न्यूज

वडसावरून चंद्रपूरला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक (क्रमांक Mh 31 cq 2770) व चंद्रपूर वरून मूल कडे जाणारा डीझल टँकर (क्रमांक Mh 40 BG 4060) या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रकला आग लागली.

Chandrapur Accident News
अपघातात 9 जण जागीच जळून खाक
author img

By

Published : May 20, 2022, 1:18 PM IST

Updated : May 20, 2022, 2:16 PM IST

चंद्रपूर - मूल मार्गावर गुरुवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातामध्ये तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये लागलेल्या आगीत तब्बल नऊ जणांचा जागीच होरपळून मृत्यू ( 9 killed in chandrapur accident ) झाला. सर्व मृतदेहाची राखरांगोळी झाली.

डिझेल टॅंकर व ट्रकची धडक - प्राप्त माहितीनुसार गुरुवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास वडसावरून चंद्रपूरला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक (क्रमांक Mh 31 cq 2770) व चंद्रपूर वरून मूल कडे जाणारा डीझल टँकर (क्रमांक Mh 40 BG 4060) या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रकला आग लागली. अपघात इतका भीषण होता की अनेकांचा जागीच मृत्यू झाला होता. जे जखमी होते त्यांना देखील बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. कारण डिझेलचा टँकर असल्याने लगेच वाहनाने पेट घेतला आणि बघता बघता हे दोन्ही वाहने आगीच्या विळख्यात चालले गेले.

अपघातात 9 जण जागीच जळून खाक

9 जणांचा जागीच मृत्यू - लाकडाच्या गाडीत सहा मजूर आणि एक चालक होता. ते वडसा येथून मूलमार्गे चंद्रपूरकडे येत होते. यामध्ये वाहनचालक 30 वर्षीय अजय सुधाकर डोंगरे (BTS प्लॉट, बल्लारपूर) 33 वर्षीय प्रशांत मनोहर नगराळे, 30 वर्षीय मंगेश प्रल्हाद टिपले, 25 वर्षीय महिपाल परचाके, 46 वर्षीय बाळकृष्ण तुकाराम तेलंग, 40 वर्षीय साईनाथ बापूजी कोडापे (राहणार नवी देहली), 22 वर्षीय संदीप रवींद्र आत्राम (रा. तोहोगाव कोठारी) हे सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठी चंद्रपूरला येत होते. तर डिझेल टँकरमध्ये वाहनचालक 35 वर्षीय हनिफ खान (रा. अमरावती), कंडक्टर 35 वर्षीय अजय पाटील (वर्धा) हे दोघे होते. या दोघेही वाहनामधील नागरिकांचा जागीच होरपळून मृत झाला.

हेही वाचा - OMICRON BA4 : ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात प्रवेश.. 'या' ठिकाणी आढळला पहिला रुग्ण

Last Updated : May 20, 2022, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.