चंद्रपुर - महाराष्ट्रातून गांजा वाहतूक करताना एका सरकारी शिक्षकाला त्याच्या चालकासह पकडण्यात आले. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर पोलिसांनी शनिवारी चिचपल्लीजवळ वाहन तपासणी केली. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी घटनेची चौकशी करत संबंधितांना ताब्यात घेतले आहे.
2 कार जप्त करून यातील व्यक्तींना अटक - मंथनी शहरातील सरकारी शिक्षक मच्छिडी श्रीनिवास गौड आणि गंता शंकर यांना तपासणीदरम्यान दोन वेगवेगळ्या कारमध्ये गांजा घेऊन जाताना पकडे आहे. दरम्यान, पोलिसांना दोन्ही वाहनांमध्ये 32 लाख रुपये किंमतीचा 103.83 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच, पोलिसांनी गांजा, 2 कार जप्त करून यातील व्यक्तींना अटक केली आहे.
ते आजारपणामुळे रजेवर होते - श्रीनिवास गौड हे मंथनी येथील बेस्टपल्ली प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. त्यांचे काका टीआरएसचे झोनल नेते होते. शंकर हा यापूर्वी श्रीनिवास गौड यांच्या मामाकडे कार चालक म्हणून कामाला होता. श्रीनिवास गौड यांना प्रशिक्षण वर्गात उपस्थित राहणे आवश्यक असताना, ते आजारपणामुळे रजेवर होते असे सांगितले आहे.
हेही वाचा - Goa Ministers : असं आहे गोव्यातील मंत्रिमंडळ; 'या' आमदारांना मिळाली संधी...