चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे मोठे नुकसान झाले आहे. मावा, तुडतुड्या रोगाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मावा, तुडतुड्या किडीने झालेल्या नुकसानाचे त्वरित सर्वेक्षण करावे तसेच त्याची त्वरित नुकसानभरपाई जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना पत्र पाठविले आहे.
चंद्रपूर जिल्हा हा धानपिकासाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, सावली, मुल, नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपूरी, चिमूर हे तालुके धान उत्पादक तालुके आहे. ऑक्टोबरमध्ये सदर तालुक्यांमधील धानपीकांवर मावा व तुडतुड्याने आक्रमण केले. त्यामुळे उभी पिके नष्ट झाली. म्हणून धानाच्या उत्पादनात यावर्षी मोठी घट होणार आहे. अनेकांचा उत्पादन खर्च सुध्दा भरून निघेल किंवा नाही, अशी परिस्थिती आहे. शेतक-यांनी हा रोग आटोक्यात येण्यासाठी तीन ते चार वेळा फवारणी केली, मात्र रोग आटोक्यात आला नाही. मावा व तुडतुड्यामुळे धानाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शेतात केवळ तणीस शिल्लक आहे. आधीच आर्थिक हालअपेष्टा सहन करणारा धान उत्पादक शेतकरी या संकटामुळे हवालदिल झाला आहे. अद्याप धान उत्पादक शेतक-यांच्या या झालेल्या नुकसानाचे पंचनामे झालेले नाहीत. सदर नुकसानाचे पंचनामे तातडीने करून धान उत्पादक शेतक-यांना मदतीचा हात देण्याची नितांत आवश्यकता आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या; मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - सुधीर मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मावा व तुडतुड्यामुळे धानाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शेतात केवळ तणीस शिल्लक आहे. आधीच आर्थिक हालअपेष्टा सहन करणारा धान उत्पादक शेतकरी या संकटामुळे हवालदिल झाला आहे. अद्याप धान उत्पादक शेतक-यांच्या या नुकसानाचे पंचनामे झालेले नाहीत. सदर नुकसानाचे पंचनामे तातडीने करून धान उत्पादक शेतक-यांना मदतीचा हात देण्याची नितांत आवश्यकता आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.