चंद्रपूर - दिवाळीच्या अखेरच्या दिवशी का होईना राज्यातील देवालये सुरू करण्यासाठीचा प्रकाश राज्य सरकारच्या डोक्यात पडला, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. टाळेबंदी खुली केल्यानंतर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून राज्यातील देवालये उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यावर मुनंगटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
देवालये उघडण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या महाकाली मंदिराची दारे उघडण्यात आली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज महाकाली मंदिरात जाऊन भाजप कार्यकर्त्यांसोबत महाआरती केली. या वेळी त्यांनी सरकारचे अभिनंदन करतानाच मंदिर सुरू करण्यास लावलेल्या उशीराबाबत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की राज्यातील विविध धर्मांची देवालये बंद ठेवण्यामागे कुठलाही तर्क नव्हता. मात्र, लोकांच्या आस्थेची गळचेपी या माध्यमातून करण्यात आली.
सामान्य लोकांचा देव आजही देवालयात!
दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातील अंधार दूर झाला. मंदिर सुरू करण्याचा प्रकाश त्यांच्या डोक्यात पडला आहे. सरकारने राजकारण न करता तर्काच्या आधारावर निर्णय घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशात सर्वत्र देवालये सुरू करण्यात आली. कारण लोकांची आस्था त्यात आहे. ज्या लोकांचा थेट देवांशी संबंध आहे, अशांना मंदिर, मशीद, गुरुद्वारा, गिरीजाघर, बौद्ध विहारांची गरज नाही. मात्र, सामान्य लोकांचा देव आजही देवालयात असतो. त्यासाठी त्यांना तिथेच जावे लागते, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. केवळ पैशासाठी दारूची दुकाने, मॉल, चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लोकांच्या आस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, अखेर सरकारला देवालये उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, टाळेबंदी खुली केल्यानंतर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून राज्यातील देवालये उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलने केली होती.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने धार्मिक स्थळे खुली-
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे देशातील प्रार्थनास्थळेही बंद होती. राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यातच भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरं उघडावी अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर आजपासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबईमधील अनेक मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च आजपासून उघडण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई देवीचे मंदिर, शिर्डी साई बाबा मंदिर, नांदेड गुरुद्वारा आणि मुंबईतील हाजी अली दर्गा ही प्रार्थनास्थळे आज भक्तांसाठी खुली झाली असून