ETV Bharat / state

'सरकारकडून ३३ कोटी वृक्ष लावण्याची मोहीम, मात्र वनविभागाकडे तेवढी रोपटीच नाहीत'

राज्यातील भाजपचे सरकारच अपशकुनी आहे. जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हापासून म्हणजेच मागील पाच वर्षांपासून राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे अशी टीका, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज चंद्रपुरात केली.

नाना पटोले
author img

By

Published : Aug 29, 2019, 9:13 PM IST

चंद्रपूर - खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणते की, काँग्रेस पक्ष हा भाजपवर जादूटोणा करतो. त्यामुळेच मी हे जाणीवपूर्वक म्हणतो आहे की, राज्यातील भाजपचे सरकारच अपशकुनी आहे. जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हापासून म्हणजेच मागील पाच वर्षांपासून राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे अशी टीका, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज चंद्रपुरात केली.

राज्यातील भाजपचे सरकार अपशकुनी- नाना पटोले

पटोले यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली 'महापर्दाफाश' यात्रा आज चंद्रपुरात आली. यावेळी पटोले यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. राज्यात ३३ कोटी वृक्ष लावण्यात येत आहेत. मात्र, इतकी रोपटी वन विभागाकडेच नाहीत. खासगी लोकांकडून ही रोपटी घेतली जात आहेत. ही लोक खरंच रोपटे घेत आहेत, की निव्वळ बिल देत आहेत, असा सवाल पटोले यांनी केला. अभिनेते सयाजी शिंदे यांनी तर हा प्रकार बोगस असल्याचे विधान केले. मात्र, लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करून हा आवाज गप्प करण्याचे पाप या सरकारने केले.

भाजपचे सरकार अपशकुनी आहे. त्यांच्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जे काही थोडेफार उत्पन्न शेतकऱ्याला मिळत होते, आता ते ही हिरावून घेतले असल्याची सडकून टिका पटोले यांनी सरकारवर केली. गांधी चौक येथे त्यांची सभा पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते अनुपस्थित होते. खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार सुभाष धीट आणि काँग्रेसचे अन्य स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते.

Intro:चंद्रपुर : "खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणते की काँग्रेस पक्ष हा भाजपवर जादूटोना करते त्यामुळेच मी हे जाणीवपूर्वक म्हणतोय की राज्यातील भाजपचे सरकारंच अपशकुनी आहे. जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हापासून म्हणजे मागील पाच वर्षांपासून राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे", अशी टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज चंद्रपुरात केली. त्यांची महापर्दाफाश यात्रा चंद्रपुरात पोचली असताना त्यांनी जाहीरपणे हे वक्तव्य केले.
नाना पटोले यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली महापर्दाफाश आज चंद्रपुरात आली. यावेळी पटोले यांनी भाजप सरकार कडाडून टीका केली. राज्यात 33 कोटी वृक्ष लावण्यात येत आहे. मात्र, इतके रोपटे वनविभागाकडेच नाहीत. खासगी लोकांकडून ही रोपटे घेतली जात आहेत. ही लोक खरंच रोपटे घेत आहेत की निव्वळ बिल देत आहेत, असा सवाल पटोले यांनी केला. अभिनेता सयाजी शिंदे याने तर हा प्रकार बोगस असल्याचे विधान केले. मात्र, लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा दुरूपयोग करून हा आवाज गप्प करण्याचे पाप या सरकारने केले. भाजपचे सरकार अपशकुनी आहे. त्यांच्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जे काही थोडेबहू उत्पन्न शेतकऱ्याला मिळत होते आता ते ही हिरावून घेतले आहे असेही पटोले म्हणाले. गांधी चौक येथे त्यांची सभा पार पडली. यावेळी विरोधीपक्षानेते अनुपस्थित होते. खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार सुभाष धीटआणि काँग्रेसचे अन्य स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते.
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.