चंद्रपूर एक एनजीओ किती प्रभावी असू शकते याचे आदर्श उदाहरण बंडू धोत्रे यांच्या इको प्रो संघटनेने स्थापित केले आहे पंतप्रधान, केंद्रीय पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. चंद्रपूरच्या घनदाट जंगलात जैवविविधता संपन्न असलेल्या ठिकाणी कोळसा खान येणार होती, मात्र इको प्रो संघटनेने याचा कडाडून विरोध केला. अनेक दिवस हा संघर्ष सुरू होता मात्र या संघटनेने हार मानली नाही, अखेर तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी याची दखल घेतली, त्यांनी चंद्रपूर येऊन ही कोळसा खणीची मान्यता रद्द करणार असल्याची घोषणा केली. याच प्रमाणे चंद्रपूर शहरात असलेल्या जीर्ण झालेल्या किल्ल्याची स्वच्छता या संघटनेने केली. या कार्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली त्यांनी 'मन की बात' मध्ये या आदर्श कार्याची स्तुती केली.
इको प्रो संघटनेचे कार्य
वन्यजीव संर्वधन
सर्पसंरक्षण व प्रबोधन
पर्यावरण संवर्धन
पुरातत्व संर्वधन
आपातकालीन व्यवस्थापन
रक्तदान व आरोग्य
सामाजीक कार्य आदी.
इको प्रो संघटने केलेली आंदोलने आणि उपक्रम
कोळसा खाण विरोधी आंदोलन ताडोबा तसेच लोहारा जंगल परिसरातील वन्यजिवाच्या अधिवास, वन्यप्राण्याचे संचारक्षेत्र व चंद्रपुरातील पर्यावरणास धोकादायक प्रस्तावीत कोळसा खाण प्रकल्पाविरोधात इको प्रो संघटनेने यशस्वी संघर्ष केला. यासाठी दोनदा अन्नत्याग सत्याग्रहही करण्यात आला.
हिवाळी अधिवेशन, नागपूर-डिसें., 2008 (8 दिवस)
चंद्रपुर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 जुलै 2 ऑगस्ट 2009 असे 13 दिवस आंदोलन करण्यात आले
चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील मालधक्का प्रदुषण व शहरातील इतर प्रदुषणाविरोधात संघर्ष केला त्यासाठी अन्नत्याग सत्याग्रहही करण्यात आला
बाबुपेठ उडडानपुलासाठी संघटनेने अन्नत्याग सत्याग्रह केला यात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 13 दिवस अन्नत्याग आंदोलन केले
वाघांच्या प्रभावी संरक्षणाच्या मागणीसाठीही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अन्नत्याग सत्याग्रह केले
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनवर्सन कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला नवेगाव व जामणी या गावाचे पुनवर्सनसाठी अशासकीय संस्था इको प्रो संस्थेची मदत घेण्यात आली आहे. पुढील गावाचे पुनवर्सन कार्य सुरू आहे.
चंद्रपूर महा औषणिक विद्युत केंद्रचे जुने संच क्रमांक 1 व 2 विरोधात जनहित याचिका संघटनेने दाखल केली होती त्यानुसार उच्च न्यायालयाने हे दोन्ही जुने दोन्ही संच बंद करण्याचे आदेश दिले
संकटग्रस्त वन्यप्राणी रेस्क्यु ऑपरेशन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जंगलातील वन्यप्राण्यांचे रेस्कू ऑपरेशनही पार पाडले यात एकूण 106 रेस्क्यु ऑपरेशन करण्यात आले वाघ, बिबट, अस्वल, मगर, रानगवे आणी तृणभक्षी प्राण्यांना जीवदान देण्यात आले जिल्हयात मानव-वन्यजीव संघर्ष तिव्र असुन तो निवारण्याकरीता वनविभागासोबत कार्य सुरू आहे.
चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान 1 मार्च 2017 पासुन नियमीतपणे सुरू आहे. आज अभियानास 286 दिवस पुर्ण झाले आहेत. जवळपास 11 किमी लांब किल्लाची स्वच्छता रोज नियीमत सकाळी 6 ते 10 या वेळेत श्रमदान करून करण्यात येते. या अभियानाची दखल घेत पंतप्रधान, नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या मन की बात मध्ये इको प्रो संस्थेचा गौरव केलेला आहे.
नागोबा ते वाघोबा असा प्रवास, पर्यावरण-प्रुदषण, आपातकालीन व्यवस्थापन, पुरातत्व संवर्धन, रक्तदान-आरोग्य, सामााजीक क्षेत्रात इको-प्रो संस्थेचे नगर संरक्षक दल, वन्यजीव संरक्षक दल तर ग्रामीण भागात ग्राम रक्षक दलाची निर्मीती करून युवकांची मोठी चळवळ सुरू आहे. शेतकरी आणी वाघ संघर्ष टाळण्याकरीता शासनाकडे सातत्यपूर्ण अभ्यासपूर्ण पाठपुरावा व आंदोलन करण्यात येत आहे शेतपीक व वन्यप्राणी संरक्षणासाठी सौर उर्जा कुंपण योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
पर्यावरण जनजागृती करीता शाळा-शाळांत इको प्रो स्कुल क्लबची निर्मीती करण्यात आली आहे त्यामाध्यमातून रामाळा तलाव स्वच्छता अभियान 2009 श्रमदानामधून तलाव स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला रामाळा तलाव संवर्धनासाठी 12 दिवस अन्नत्याग सत्याग्रह करण्यात आला चंद्रपूर जिल्हा ऐतिहासिक वारसा संवर्धनाकरिता आपला वारसा आपणच जपुया अभियानाल सुरुवात करण्यात आली त्यासाठी दुचाकीने 25 सदस्यांसोबत महाराष्ट्र परिक्रमा करण्यात आली महाराष्ट्र शहरी तलाव संवर्धन मोहिम सुरुवात करण्यात आली