ETV Bharat / state

ट्यूबलेस टायरमधून चक्क गांजाची तस्करी; 30 लाखांचा माल स्थानिक गुन्हे शाखेने पकडला

आज सकाळी राजुरा पोलीस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलातून दोन आंतरराज्यीय गांजा माफियांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून अंदाजे ३० लाख रुपये किंमतीचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला. चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी (वय ३७), सागर वाल्मिक पाझारे (वय २६, दोघेही रा. वरोरा) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

author img

By

Published : Jun 18, 2021, 5:23 AM IST

चंद्रपूर : कारच्या ट्युबलेस टायरमध्ये गांजा टाकून त्याची तस्करी करीत असल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 90 किलो गांजा जप्त केला.
तेलंगणा राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तस्करांवर नजर ठेऊन होते.

३० लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त

आज सकाळी राजुरा पोलीस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलातून दोन आंतरराज्यीय गांजा माफियांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून अंदाजे ३० लाख रुपये किंमतीचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला. चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी (वय ३७), सागर वाल्मिक पाझारे (वय २६, दोघेही रा. वरोरा) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हेशाखेला मिळाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने सापळा रचून तस्करांना सुमठाना जंगलातून अटक केले.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे पथकाची कामगीरी

ही कामगीरी सहायक पोलिस निरीक्षक केमेकर, गणेश भोयर, विनोद, प्रमोद, गोपीनाथ यांचे विशेष पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडेने पार पाडली. हे पथक मागील चार दिवसांपासून राजुरा पोलिस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलात ठाण मांडून होते. आज सकाळच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीने गांजाची तस्करी केली जात होती. या पथकाने वाहने थांबवून तपासणी केली. तेव्हा दुचाकी वाहनावरील दोन चुंगड्यात गांजा आढळून आला. तसेच चारचाकी वाहनातील ट्युबलेस टायरमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला. यावेळी अन्य दोघे सुमारे १० किलो गांजा घेऊन पसार झाले. पोलीसांना सुमारे ३० लाख रूपये किंमतीचा ९० किलो गांजा अंदाजे मिळाला आहे. यामध्ये सर्व गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली वाहने जप्त केली. राजुरा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्यांच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे. फरार दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. हा गांजा राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा शहरात वितरित केला जाणार होता. अशी माहिती अटक व्यक्तींनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत आहेत.

हेही वाचा- एसी बोगीतून गांजाची तस्करी; 90 किलो गांजासह सहा आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.