ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा गावे झाली सिंचनयुक्त, 16 जानेवारीला लोकार्पण - चंद्रपूर जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले

चांदा ते बांदा हा प्रकल्‍प राबविण्‍याचे तत्‍कालीन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2016-17 च्या अर्थसंकल्‍पात सिंचन सुविधा देण्यासाठी योजना आणली होती. याचे लोकार्पण 16 जानेवारीला चंद्रपुरातील चिचाळा गावात होणार आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jan 9, 2020, 7:37 AM IST

चंद्रपूर - माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत मूल तालुक्‍यातील चिचाळा व नजिकच्‍या 6 गावांना शेतीला सिंचन सुविधा पुरविण्‍यासाठी 23 कोटी 47 लाख 54 हजार निधी मंजूर करण्‍यात आला होता. या योजनेचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण 16 जानेवारीला चिचाळा येथे संपन्‍न होणार आहे.

हेही वाचा - सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा, निराधारांसह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत

चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्‍ह्यांमध्‍ये साधनसंपत्‍तीवर आधारीत सघन नियोजन व विकास करण्‍यासाठी चांदा ते बांदा हा प्रकल्‍प राबविण्‍याचे तत्‍कालीन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2016-17 चा अर्थसंकल्‍प विधीमंडळात सादर करताना जाहीर केले होते. त्‍यानुसार चांदा ते बांदा या प्रकल्‍पांतर्गत असोलामेंढा तलावाच्‍या मुख्‍य कालव्‍यातून नळजोडणीमार्फत मूल तालुक्‍यातील चिचाळा येथील तसेच नजिकच्‍या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्‍याचा निर्णय मुनगंटीवार यांनी घेतला होता. याला 29 नोव्‍हेंबर 2016 रोजीच्‍या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली. या योजनेचे काम आता पूर्ण झाले असून योजना लोकार्पणासाठी सज्‍ज आहे. योजनेचे लोकार्पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते संपन्‍न होणार असून कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्ष संध्‍या गुरनुले, मूल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, उपसभापती घनश्‍याम जुमनाके आदींची उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा - चंद्रपुरात पहिल्यांदाच हिमालयन गिधाडाची नोंद, माना टेकडीजवळ झाले कॅमेऱ्यात कैद

Intro:चंद्रपूर :

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत मुल तालुक्‍यातील चिचाळा व नजिकच्‍या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्‍याकरिता 23 कोटी 47 लक्ष 54 हजार निधी मंजूर करण्‍यात आला आहे. या योजनेचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण 16 जानेवारीला चिचाळा येथे संपन्‍न होणार आहे.

चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्‍हयांमध्‍ये साधनसंपत्‍तीवर आधारीत सघन नियोजन व विकास करण्‍यासाठी चांदा ते बांदा हा प्रकल्‍प राबविण्‍याचे तत्‍कालीन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2016-17 चा अर्थसंकल्‍प विधीमंडळात सादर करताना जाहीर केले होते. त्‍यानुसार चांदा ते बांदा या प्रकल्‍पांतर्गत असोलामेंढा तलावाच्‍या मुख्‍य कालव्‍यातुन नळजोडणी मार्फत मुल तालुक्‍यातील चिचाळा येथील तसेच नजिकच्‍या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्‍याचा निर्णय मुनगंटीवार यांनी घेतला. यासंदर्भात 29 नोव्‍हेंबर 2016 रोजीच्‍या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्‍यता सुध्‍दा देण्‍यात आली. या योजनेचे काम आता पूर्ण झाले असून योजना लोकार्पणासाठी सज्‍ज आहे. योजनेचे लोकार्पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते संपन्‍न होणार असुन कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, उपसभापती घनश्‍याम जुमनाके आदींची उपस्थिती राहणार आहे.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.